‘धकधक गर्ल’ म्हटल की, माधुरी दीक्षित हे नाव आपसूक आपल्या डोळ्यासमोर येत. माधुरीने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले. हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हणुन माधुरी दिक्षितच्या कारकिर्दिची ओळख सांगितली जाते. अभिनयासोबतच माधुरी आपल्या नृत्यकौशल्यासाठी विशेष ओळखली जाते. आजही माधुरीच्या ठुमक्यांचे चाहते वेडे आहेत. या बाबतीत माधुरीचा हात कोणीच धरु शकत नाही. अशातच माधुरीचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. या व्हिडिओवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.
पाकिस्तानी अभिनेता आणि गायक अली जफर (ali zafar) याने माधुरी दीक्षित (madhuri dixit) हिच्या नवीन इन्स्टाग्राम रीलवर प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामध्ये माधुरी अलीचे लोकप्रिय गाणं ‘सजनिया’वर नाचताना दिसत आहे. हे गाणे 2006 मध्ये रिलीज झाले होते, परंतु अलीकडेच ते इंस्टाग्रामवरील सर्वात ट्रेंडिंग ऑडिओपैकी एक बनले आहे. कॅप्शनमध्ये कोणतीही ओळ न जोडता अली जफरने माधुरी दीक्षितला टॅग केले आहे.
व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षितने पांढऱ्या फुलांच्या ब्लेझरसह पांढऱ्या रंगाचा पँट परिधान केला आहे. तर व्हिडिओच्या उजव्या पॅनलवर अली जफर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
View this post on Instagram
अलीने माधुरीला नाचताना पाहिले तेव्हा, त्याने उत्साहाने स्व:ताचे तोंड दाबले. साहजिकच माधुरीला अशा प्रकारे नाचताना पाहून त्याला खूप आनंद झाला आहे. व्हिडिओ पाहूण ताेही गाण्याच्या तालावर नाचू लागला. त्याच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, एका सोशल मीडिया वापरकर्त्याने म्हटले, “हा खूप गोड आणि यशस्वी फॅनबॉय आहे.”, तर दुसरा चाहता म्हणाला, “कोणीतरी त्याला भारतात घेऊन या.”
अली जफरने 2010 मध्ये ‘तेरे बिन लादेन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमधील पाकिस्तानी अभिनेत्यावर बहिष्कार टाकल्यानंतर त्याला हिंदी चित्रपटांपासून दूर राहावे लागले. 2016 मध्ये उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना इंडस्ट्रीत काम करण्यापासून रोखण्यात आले होते. अली जफर शेवटचा पाकिस्तानी चित्रपट ‘खेल खेल में’ मध्ये दिसला होता. यामध्ये त्याने छोटी भूमिका केली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पॅपराझींना बघून जया बच्चन यांचा राग अनावर; चाहते म्हणाले, ‘अशांना बाॅयकाॅट करायला पाहिजे’
तायक्वांदो सामन्यात शाहरुखचा लेक विजेता! अबरामने आनंदात घेतले वडिलांचे चुंबन, पाहा व्हिडिओ