बाॅलिवूडची लाेकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित रिऍलिटी डान्स शो आणि काही निवडक चित्रपटांमध्ये काम करत आहे. अभिनेत्रीने ‘देवदास’, ‘दिल’, ‘हम आपके है काेण’, ‘दिल ताे पागल है’, ‘साजन’, ‘कलंक’, ‘तेजाब’, यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले. ती त्या सर्व महिलांसाठी आदर्श आहे ज्यांना लग्न आणि मुलांनंतर आयुष्यात काहीतरी करायचे आहे. अलीकडेच अभिनेत्रीने खुलासा केला की, कशाप्रकारे लाेकांनी तिच्या डान्सवर प्रश्न उपस्थिक केले हाेते. अभिनेत्री जेव्हा आई झाली हाेती, तेव्हा तिला घरी बसून कुटुंबाची काळजी घेण्यास सांगितले होते.
मुलाखती दरम्यान माधुरीने खुलासा केला की, “लग्नानंतर आणि आई झाल्यानंतर लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकाेण बदलला. मात्र, यापैकी कोणत्याही गोष्टीचा मला त्रास झाला नाही. चित्रपट आणि अभिनयाची आवड मी कायमच ठेवली.”
माधुरी पुढे म्हणाली, “अशा अनेक गोष्टी घडतात, ज्यात लोकांच्या वेगवेगळ्या धारणा असतात. बरेच लोक म्हणतात, तू आता आई आहेस, मग तू का नाचत आहेस? आता तु घरी बस, घर सांभाळ, पण मला वाटतं आपण मुलं, घर कसंही सांभाळतो.”
View this post on Instagram
माधुरी दीक्षित आहे या लाेकांची ऋणी
माधुरी दीक्षित म्हणाली मला असे वाटते की, “लोक हाउस वाइफला खूप हलक्यात घेतात. ही वृत्ती चुकीची आहे. महिलांनी असे काहीतरी केले पाहिजे जे केवळ त्यांच्यासाठीच आहे. लोकांच्या अशा गोष्टींची पर्वा करायला नाही पाहिजे. यासाठी मी पती, आई आणि सासूचे आभार मानते.”
View this post on Instagram
माधुरी दीक्षित ‘मजा मा’मध्ये दिसली होती
माधुरीच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर माधुरी शेवटची आनंद तिवारीच्या ‘माजा मा’ मध्ये गजराज राव, ऋत्विक भौमिक, बरखा सिंग आणि सृष्टी श्रीवास्तव यांच्यासोबत दिसली होती. हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. यामध्ये तिने एका डान्सर व्यतिरिक्त अशा मुलाची भूमिका साकारली ज्याला आपल्या मनाप्रमाणे लग्न करायचे आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
जलवा! लॅक्मे फॅशन वीकमध्ये ‘या’ अभिनेत्रीने केला फूल कॉन्फिडेंसमध्ये रॅम्प वाॅक
रकूलचा सिंपल आणि हटके लूक होतोय व्हायरल, तुम्ही पाहिलात का?