Wednesday, June 26, 2024

माधुरीच्या मुलाने कॅन्सरग्रस्तांसाठी केले ‘असे’ काम, व्हिडिओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘मला अभिमान आहे’

बॉलिवूडमधील अनेक कलाकार सोशल मीडियाचा प्रचंड वापर करतात. ते नेहमीच आपल्या आयुष्याशी निगडित अनेक खुलासे करत असतात. आपल्या मुलांबद्दल देखील काही ना काही माहिती देत असतात. नुकतेच आता बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले की, तिला तिच्या धाकट्या मुलाचा अभिमान आहे. कारण तिच्या मुलाने असं काही केलं आहे, जे ऐकून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल. ज्याचा माधुरीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो तूफान व्हायरल होत आहे.

कॅन्सरग्रस्त असलेल्या लोकांना पाहून रायनचे मन दुखले आणि केस दान करण्याचा निर्णय घेतला. माधुरी दीक्षितने रायनचा एक व्हिडिओ शेअर करत त्याला हिरो म्हटले आहे. तिने सांगितले की, कॅन्सरग्रस्त लोकांना पाहून रायनला खूप वाईट वाटते. त्याला त्या लोकांबद्दल खूप सहानुभूती आहे.

माधुरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर रायनचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, “सर्व हिरो टोपी घालत नाहीत…पण माझा घालतो. राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त, मला खरोखर काहीतरी खास शेअर करायचे आहे.”

तिने पुढे लिहिले की, “रायनने अनेक लोकांना कॅन्सरमधून जाताना पाहिले आहे, ज्यामुळे त्याचे हृदय तुटले. ते खूप वाईट गोष्टीतून जातात, त्यांचे केस गळतात. माझ्या मुलाने आपले केस कॅन्सर सोसायटीला दान करण्याचा निर्धार केला होता. आई-वडील या नात्याने त्याच्या या निर्णयाने आम्हाला आनंद झाला.”

माधुरीने खुलासा केला की, रायनने जवळजवळ दोन वर्षे केस कापले नाहीत. कारण त्याला कॅन्सरने पीडित लोकांना मदत करायची होती. ती म्हणाली की, “मार्गदर्शक तत्वांनुसार, केसांची आवश्यक लांबी वाढवण्यासाठी त्यांना सुमारे २ वर्षे लागली आणि ही शेवटची पायरी होती. आज आपण इथे अभिमानाने उभे आहोत.” यामध्ये तिने आपले पती डॉक्टर श्रीराम नेने यांनाही टॅग केले आहे.

चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, “तुमच्या मुलाचा अभिमान आहे आणि चांगल्या संगोपनाबद्दल अभिनंदन,” दुसऱ्याने लिहिले की, “मग लांब केसांचे कारण होते का? ओहह…” आणखी एकाने लिहिले, “अविश्वसनीय, रायनचे खूप आभार. खरोखर खरा हिरो.”

माधुरी दीक्षितच्या या पोस्टवर चाहत्यांसह कलाकार देखील प्रेम व प्रतिसाद देत आहेत. फराह खान, शिल्पा शेट्टी, जिनिलिया देशमुख, दिया मिर्झा, रिद्धिमा पंडित, जुही चावला यांच्यासह अनेक कलाकारांनी कमेंट करून रियानचे कौतुक केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा