Thursday, July 18, 2024

सोप्पा नाहीये सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचा सिनेप्रवास; वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी दिले होते ऑडिशन

कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत, जे छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी प्रयत्न करत असतात. काहींना यासाठी फार काळ वाट पाहावी लागत नाही, तर काहींनी कितीही वर्षे वाट पाहिली, तरीही यश मिळत नाही. मात्र, छोट्या पडद्यावरील एक अभिनेत्री आहे, जिने आपल्या अस्सल अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडचे दार ठोठावले आहे. ती अभिनेत्री म्हणजेच, महिमा मकवाना होय. महिमाने सुपरस्टार सलमान खान याच्या ‘अंतिम‘ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान तिने तिच्या संघर्षाविषयी खुलेपणाने चर्चा केली होती. चला तर जाणून घेऊया महिमाबद्दल…

अभिनेत्री महिमा मकवाना (Mahima Makwana) हिने मुलाखतीत सांगितले होते की, वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी तिने काम करायला सुरुवात केली होती. ती पुढे म्हणाली की, एक काळ असा होता, जेव्हा ती तिच्या कुटुंबातील एकमेव कमावती सदस्य होती. या कारणास्तव तिने वयाच्या अवघ्या 10व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली होती.

अभिनेत्रीने तिच्या संघर्षाबद्दल बाेलताना सांगितले की, तिने वयाच्या 10व्या वर्षीपासून ऑडिशन द्यायला सुरुवात केली होती. यावेळी महिमा म्हणाली की, तिला याचा अजिबात पश्चात्ताप होत नाही, कारण हा तिचा प्रवास आहे. तिने केलेल्या सर्व चुकांसाठी ती स्वतः जबाबदार आहे, परंतु त्या चुकांमधून ती खूप काही शिकली. तिचा हा प्रवास तिच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. तिला अनेक अडचणींना सामाेरे जावे लागले, असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. महिमासाठी वयाच्या 10व्या वर्षी तिची कला व्यवसायाच्या रूपात बदलणे अजिबात सोपे नव्हते. मात्र, एक दिवस ती नक्कीच रुपेरी पडद्यावर दिसेल आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करेल, असे स्वप्न त्यावेळी पाहात असल्याचे तिने सांंगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahima Makwana (@mahima_makwana)

या मुलाखतीदरम्यान महिमा पुढे म्हणाली की, तिने जेव्हा सर्वप्रथम कामाला सुरूवात केली, त्याचवेळी तिने निश्चय केला की, आयुष्यभर ती हेच काम करेल. अभिनेत्री म्हणाली की, ती सिंगल पॅरेट आहे, अशा परिस्थितीत तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. मात्र, बालपणीच या गाेष्टी अभिनेत्रीने समजून घेतल्या आणि करिअरवर लक्ष केंद्रित केले. यादरम्यान तिचे शाळा आणि काॅलेजकडे फार दुर्लक्ष झाले, पण जे हाेते ते काही कारणांमुळे हाेते, असे अभिनेत्रीने सांगितले.

अभिनेत्रीच्या बॉलिवूड सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘अंतिम’ चित्रपटात सलमान खान याचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा याच्यासोबत दिसली होती. त्यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात सलमान खान, उपेंद्र लिमये, महेश मांजरेकर आणि सयाजी शिंदे यांसारख्या अभिनेत्यांच्या भूमिकाही होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बोल्ड ड्रेसमध्ये अभिनेत्रीने वाढवला इंटरनेटचा पारा, ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांनाही घातली भुरळ
साऊथच्या अभिनेत्रीने निर्मात्याशी थाटला संसार; नवरदेवाला पाहताच नेटकरीही म्हणाले, ‘हे कसं शक्य?’
सर्वाधिक चर्चेत असलेल्या बॉयकॉटबद्दल हे काय बोलून गेली स्वरा? म्हणाली, ‘सुशांतच्या निधनानंतर आलियाला…’

हे देखील वाचा