भोजपुरी अभिनेत्री महिमा सिंग (Mahima Singh) आज संगीत उद्योगातील एक प्रसिद्ध नायिका आहे. तिचे कोणतेही व्हिडिओ गाणे आले, तर चाहते अक्षरश: वेडे होतात. तिच्या व्हिडिओंना चाहत्यांचा आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. अशा परिस्थितीत आता ती तिच्या कोणत्याही गाण्यामुळे नाही, तर तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये तिने अन्न वाया घालवणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे.
महिमाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एका पार्टीमध्ये प्लेट्स दिसत आहेत आणि त्यामध्ये अन्नाची नासाडी स्पष्टपणे दिसत आहे. या अन्नाच्या नासाडीबाबत महिमाने फोटोसह त्या लोकांना फटकारत लिहिले की, “मुलीच्या बापाकडून आमंत्रण होते, नाहीतर लोक १० रुपयांची चाट खातात, मग थाळीपर्यंत चाटतात. वाईट वाटले तर सॉरी…” त्याचवेळी काही युजर्सने तिच्या या गोष्टीचे समर्थनही केले आहे. एका युजरने लिहिले की, “वाईट वाटण्यासारखी गोष्ट नाही, जेवढे खाऊ शकता तेवढेच घ्यायला पाहिजे ना, किती लोकांना खायलाही मिळत नाही, अन्नपूर्णा देवीला असे लहान करू नका, अन्नाची नासाडी करणे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. तुम्ही अगदी बरोबर बोलला, महिमा जी.” (actress mahima singh get angry on wasting food in parties see here her post)
यासोबतच आणखी एका युजरनेही महिमाचे समर्थन करत लिहिले की, “अगदी बरोबर बोलतात, नेहमीच लोक त्याला तोपर्यंत वापरतात जोपर्यंत त्यांचे मन भरेल, मग तो माणूस असो वा अन्न. पोट भरले की, अन्नाची काही किंमत नाही समजत, पण जेव्हा घरी काही राहत नाही तेव्हा त्याचं रोटी साठी तरसतात. त्यामुळे प्लीज अन्न वाया घालवू नका.”
महिमा सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नुकताच तिचा खेसारी लाल यादव (Khesari lal yadav) याच्यासोबतचा ‘कजरा झगड़ा करा देले बा’ ( Kajra Jhagra Kara Dele Ba) हा नवीन म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आतापर्यंत या व्हिडिओ गाण्याला ८ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आणि २.५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या गाण्यात महिमा सिंग आणि खेसारी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. भोजपुरी गाणे ‘कजरा झगड़ा करा देले बा’ खेसारी लाल यादव आणि शिल्पी राज यांनी त्यांच्या उत्कृष्ट आवाजाने सजवले आहे.
हेही नक्की वाचा –