Wednesday, July 3, 2024

“माझे शरीर माझ्या मेंदूला साथ देत नव्हते”, मलायकाने तिच्या ‘त्या’ कठीण काळात घडलेल्या गोष्टीचा केला उलगडा

आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. मलायका ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फिटनेस व्हिडिओ आणि फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग देखील खूप आहे. आता देखील तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील तिचा फिटनेस पाहून तिचे चाहते नेहमी प्रमाणेच जोरदार कौतुक करत आहेत. मलायकाने तिच्या ॲब्जची एक झलक सोशल मीडियावर दाखवली आहे.

मलायकाने शेअर केलेल्या या फोटोमुळे तिचे चाहते खूप प्रेरित झाले आहेत. या फोटोमध्ये तिने जिम ड्रेस परिधान आहे. या फोटोमध्ये ती ॲब्ज फाँट करताना दिसत आहे.

या पोस्टमध्ये तिने कोरोना निगेटीव्ह आल्यानंतरचा तिचा प्रवास सांगितला आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिले आहे की, “तू खूप भाग्यवान आहेस, हे खूप सोप्पं असेल असं मी प्रत्येक दिवशी ऐकत आहे. हो!! मी माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टींसाठी आभार व्यक्त करत आहे. पण माझ्या आयुष्याने खूप छोटी भूमिका निभावली आहे. राहिला प्रश्न सोप्पं असण्याचा तर माझ्या आयुष्यातील कोणताच मार्ग सोप्पा नव्हता. 4 सप्टेंबरला मला कोरोना झाला होता. माझ्यासाठी हा खूप वाईट काळ होता. ज्यांची प्रतिकार शक्ती चांगली आहे, ते लोक कोरोनामधून लवकर बरे होतात.”

पुढे तिने सांगितले की, “माझ्याबद्दल बोलायचे झाल्यास, मी सोप्पा हा शब्द माझ्यासाठी कधीच वापरणार नाही. माझ्या शारीरिक अवस्थेने मी पुरती कोलमडून गेले होते. मला दोन पाऊलं देखील नीट चालता येत नव्हते. फक्त अंथरुणात झोपायचं आणि बसायचं. खिडकीमधून बघायचे हाच माझ्या दैनंदिन प्रवास चालू होता. मला मी खूपच कमजोर दिसत होते. माझी सहन शक्ती संपली होती. मी माझ्या कुटुंबापासून लांब होते. त्यांनतर मी माझे वजन वाढवले.”

यांनतर 26 सप्टेंबरला माझा कोरोना निगेटीव्ह असल्याचा रिपोर्ट आला. मी खूप खुश झाले होते. पण माझ्यात खूप थकवा होता. मला असे वाटत होते की, जणू काही माझे शरीर माझ्या मेंदूला सहकार्य करत नाहीये. 24 तासात मी एक तरी काम करू शकेल की नाही याची देखील शाश्वती नव्हती.”

मलायकाने लिहिले आहे की, “कोरोना नंतर माझा पहिला वर्कआऊट खूप अवघड होता. मी काहीच चांगल्याप्रकारे करू शकत नव्हते. पण मी दुसऱ्या दिवशी उठले आणि ठरवले की, मला स्वतःला घडवायचे आहे. त्यांनतर एक एक दिवस माझ्यात प्रगती होत गेली. माझा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आलेला आता 32 आठवडे होऊन गेले आहेत. आता मला पहिल्यासारखे वाटत आहे. पहिल्या सारखी एनर्जी आता माझ्याकडे आली आहे. आता मी शारीरिक आणि मानसिक रुपात स्वतःला मजबूत समजते.”

हे देखील वाचा