देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. साधी असो वा खास, बऱ्याच दिवसांनी यंदा दिव्यांनी हा सण उजळून निघाला आहे. बॉलिवूड कलाकारही पार्टी करताना दिसले आहेत. सर्वजण रंगीबेरंगी कपड्यांमध्ये सुंदर पद्धतीने पार्टीला हजेरी लावताना दिसले असले, तरी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या जोडीने बऱ्याच चर्चा रंगवल्या. या सुंदर जोडप्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पॅपराजींनाही एकही क्षण गमवायचा नव्हता.
बॉलिवूडमध्ये आयटम साँगसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळेही ती चर्चेत असते. त्याचबरोबर दिवाळीच्या या खास मुहूर्तावर दोघेही एकत्र दिसले आहेत. अनिल कपूर यांच्या घरी दिवाळीच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. या पार्टीत अर्जुन कपूर मलायका अरोरासोबत पोहोचला होता. यादरम्यान त्यांचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये दोघे एकत्र दिसत आहेत.
मलायका आणि अर्जुनचे हे फोटो एका फॅन पेजवर शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये दोघे एकत्र पार्टीला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, दोघांच्या लूक आणि स्टाइलबद्दल बोलायचे झाले, तर मलायकाने गुलाबी रंगाची साडी घातली आहे. त्यावर तिने निऑन रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. मलायकाने मेकअप आणि हातात एक सुंदर बॅग घेऊन तिचा पारंपारिक लूक पूर्ण केला. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे आणि अभिनेत्रीला पाहून पॅपराजींनी जोरदार फोटो क्लिक केले.
अर्जुनने काळ्या रंगाचा कुर्ता पँट घातला आहे. या दोघांना एकत्र पाहून त्यांचे चाहते प्रतिक्रिया देत आहेत. मलायकाच्या सौंदर्याने आणि अर्जुन, अनिल कपूर यांच्या सहवासामुळे दिवाळीची पार्टी अधिक रंगतदार झाली. अनिल कपूर यांच्या दिवाळी पार्टीत मलायका खूपच सुंदर दिसत होती.
मलायकाने खास गाण्यांनी बॉलिवूडमध्ये एक जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. ‘छैय्या छैय्या’, ‘अनारकली’ आणि ‘मुन्नी बदनाम’ यांसारख्या सुपरहिट गाण्यांनी तिने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. यासोबतच तिच्या डान्सचे व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच, मलायकाने ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ आणि ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ सारख्या शोचे परीक्षण केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एक्सप्रेशन्स असे की, नजर हटविणे कठीण! मलायका अरोराचा व्हिडिओ पाहून चाहते फिदा
-खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो! एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या बॉलिवूडच्या जोड्या
-अर्जुन कपूरने शेअर केला शर्टलेस फोटो, शानदार बॉडीसाठी अभिनेता जिममध्ये गाळतोय घाम

