Wednesday, July 3, 2024

लेकाला सोडायला विमानतळावर पोहोचले मलायका अन् अरबाज; पण एकमेकांसाठी एक शब्दही निघाला नाही तोंडातून

एकेकाळचे बॉलिवूडमधील रोमँटिक जोडपे म्हणून मलायका अरोरा आणि अरबाज खान यांना ओळखले जात होते. मात्र, या दोघांनीही २०१७मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यांच्या घटस्फोटाला पाच वर्षे उलटली आहेत. असे असले, तरीही ते नेहमी त्यांच्या मुलामुळे एकत्र दिसत असतात. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत दोघेही एकसोबत दिसत आहेत. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि तिचा एक्स पती अरबाज खान (Arbaaz Khan) हे यांचा मुलगा अरहान (Arhaan) हा सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी भारतात आला होता. सुट्टी संपवून तो विमानतळावरून रवाना होण्यापूर्वी मलायका आणि अरबाज यांची गळाभेट घेताना दिसला. यादरम्यानचा त्यांचा गोंडस क्षण पॅपराजी विरल भयानी याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत मलायका, अरबाज आणि अरहान विमानतळावर चर्चा करताना दिसले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडिओत दिसते की, मलायका तिच्या कूल लूकमध्ये दिसत आहे. तिने निळ्या रंगाचे शॉर्ट्स आणि शर्ट परिधान केला आहे. दुसरीकडे, अरबाज खानने ट्राऊझरसोबत शर्ट परिधान केला आहे. यादरम्यान अरबाज आणि मलायका मुलगा अरहानसोबत चर्चा करताना दिसत आहेत. मात्र, त्यांनी एकमेकांशी चर्चा केली नाही.

या व्हिडिओमुळे नेटकरीही चांगलेच हैराण झाले आहेत. चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “त्यांचा घटस्फोट झाला असला, तरीही त्यांना एकत्र पाहून चांगले वाटत आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “वैवाहिक राहून दु:खी राहण्यापेक्षा, घटस्फोट घेऊन आनंदी राहणे चांगले आहे.” आणखी एकाने लिहिले की, “तुम्ही पाहिलं का, मलायका अरबाजच्या डोळ्यात डोळे घालू शकत नाहीये.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “एकमेकांना हे लोक कसे सामोरे जातात, हेच मला कळत नाही.”

मलायकाने अरबाजशी घटस्फोट घेतल्यानंतर ती अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ते दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. त्यांच्या इंस्टाग्रामवर त्यांचे रोमँटिक अंदाजातील फोटो आहेत. या फोटोना चाहते जोरदार पसंती देतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
आधी बला’त्कार, नंतर हत्या? सोनालीच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासे, खुनाचा गुन्हा दाखल
बॉलिवूडवर शोककळा! हिट सिनेमे देणारा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, हार्ट अटॅकने घेतला जीव
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! ‘गँग्स ऑफ वासेपूर’ फेम अभिनेत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

हे देखील वाचा