Tuesday, July 9, 2024

बाबो! आयटम साँगसाठी मलायका घेते १.७५ कोटी रुपये; संपत्तीचा आकडा वाचून फिरतील तुमचेही डोळे

बॉलिवूडमध्ये जेव्हा आयटम साँग, फिटनेस,‌ स्टाईल या सगळ्या गोष्टींचा विषय निघतो, तेव्हा यामध्ये अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या नावाचा समावेश हमखास होत असतो. तिच्या चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करण्याची एकही संधी ती सोडत नाही.‌ मलायका शनिवारी (२३ ऑक्टोबर) तिचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या फिटनेसकडे पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. तसेच ती वेगवेगळ्या माध्यमातून खूप चांगली कमाई देखील करते. चला तर तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या लक्झरी आयुष्याबाबत…

माध्यमांतील वृत्तांनुसार, मलायकाचे नेटवर्थ १०० कोटींच्या आसपास आहे. ती एका चित्रपटातील आयटम साँगवर डान्स करण्यासाठी १.७५ कोटी एवढी मोठी रक्कम घेते. यासोबत ती रियॅलिटी शोच्या एका एपिसोडसाठी देखील खूप रक्कम घेते. हाती आलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये मलायका अरोराकडे ७३ कोटींची कंपनी आहे. यासोबतच तिचे एक डिवा योगा स्टुडिओ आहे. याची माहिती तिने तिच्या चाहत्यांना दिली आहे. (Actress Malaika Arora birthday special know about her networth income and luxurious life)

मलायकाचे मुंबईमध्ये बांद्रा येथे एक आलिशान घर आहे. मलायकाने हे घर २० कोटी रुपयांना खरेदी केले आहे. तसेच तिच्या या घरातून समुद्रकिनारा दिसतो. तसेच तिला महागड्या गाड्यांची देखील खूप आवड आहे. तिच्याकडे रेंज रोव्हर ही गाडी आहे. या गाडीची किंमत २.११ कोटी एवढी आहे. यासोबतच बीएमडब्ल्यू ७ सीरिज ७३० एलडी, टोयोटा, इनोव्हा क्रिस्टा, बीएमडब्ल्यू एक्स ७ देखील आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, मलायका अरोराची गणना देशातील १०० लोकप्रिय कलाकारांमध्ये केली जाते.

मलायका अरोराचा जन्म २३ ऑक्टोबर, १९७३ मध्ये मुंबई येथे झाला होता. तिने तिच्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. त्यानंतर तिने एमटीव्हीवरील शोमध्ये विजेच्या रुपात काम केले होते. यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले तसेच अनेक आयटम साँगवर डान्स देखील केला आहे.

तिने १९९८ मध्ये अरबाज खानसोबत लग्न केले होते. परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे तिने २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. ती सध्या तिच्या मुलासोबत राहते. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती अनेकवेळा तिचे बोल्ड फोटो आणि वर्कआऊट करताना व्हिडिओ शेअर करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अल्पावधीतच यश मिळवलेल्या झायराने अचानक ठोकला इंडस्ट्रीला ‘राम राम’, ‘या’मुळे यायच्या तिला जीवे मारण्याच्या धमक्या

-फिटनेसमध्ये तरुण अभिनेत्रींनाही टक्कर देते ४८ वर्षांची मलायका, ‘आयटम नंबर’ करून मिळवलीय तिने प्रेक्षकांची वाहवा

-अनन्या पांडेच्या अडचणीत वाढ; जुने चॅट रिट्रिव्ह करण्यासाठी एनसीबीने जप्त केल्या ‘या’ गोष्टी

हे देखील वाचा