बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री मलायका अरोरा हे बॉलिवूडमधील रोमँटिक कपल आहेत. ते कधीच एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नेहमी सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत दोघेही आपले प्रेम व्यक्त करत असतात. अशात अर्जुन रविवारी (दि. २६ जून) आपला ३७वा वाढदिवस साजरा करत आहे. आपला खास दिवस सेलिब्रेट करण्यासाठी अर्जुन मलायकासोबत काही दिवसांपूर्वीच पॅरिसला पोहोचला होता. आता मलायकाने अर्जुनला त्याच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
मलायकाची अर्जुनसाठी खास पोस्ट
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिने अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. मलायकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ आणि एक फोटो शेअर केला आहे. फोटोत दिसते की, अर्जुन खूपच खुश आहे. तसेच, व्हिडिओत मलायका अर्जुनला केक चारताना दिसत आहे. मात्र, व्हिडिओत मलायकाचा फक्त हातच दिसत आहे. मलायकाने हा व्हिडिओ शेअर करत पोस्टमध्ये लिहिले की, “हवं ते माग, मी प्रार्थना करते की, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा अर्जुन कपूर.”
View this post on Instagram
मलायका आणि अर्जुनचे फोटो
मलायका आणि अर्जुन (Malaika Arora And Arjun Kapoor) जेव्हा पॅरिससाठी निघाले होते, तेव्हा त्यांचे विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अर्जुननेही त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मलायकासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
View this post on Instagram
कसे आहे मलायका आणि अर्जुनचे नाते?
मलायका आणि अर्जुन हे आता जवळपास ५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही नेहमी एकत्र वावरताना तसेच सुट्ट्यांवर जातात. दोघांनीही त्यांचे नाते अधिकृत केले आहे. मलायका आणि अर्जुन यांच्या वयात खूप जास्त अंतर असल्यामुळे त्यांना नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मलायका ही ४८ वर्षांची आहे, तर अर्जुन हा ३७ वर्षांचा आहे. मात्र, या जोडप्याला त्याचा काहीही फरक पडत नाही.