बॉलिवूडमध्येे ‘घटस्फोट’ झाल्याचे आपल्याला अनेकदा ऐकायला किंवा पाहायला मिळते. यातील काही कलाकार जोडप्यांचे नाते ५०- ६० वर्षे टिकतात, तर काही नाते अवघ्या १-२ वर्षात संपुष्टात येतात. यातील एक नाते म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचे नाते होय. या जोडीची गणना बॉलिवूडच्या सर्वोत्तम जोडींमध्ये व्हायची. परंतु काही कारणास्तव त्यांनी दूर होण्याचा निर्णय घेतला होता. आज या लेखातून त्यांच्या घटस्फोटाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…
मलायका आणि अरबाज खान यांचे लग्न सन १९९८ मध्ये झाले होते. तब्बल १८ वर्षे त्यांनी आपल्या संसाराचा गाडा ओढला. परंतु सन २०१६ मध्ये त्यांनी एकमेकांच्या संमतीने घटस्फोटाची घोषणा केली होती. यानंतर त्यांना सन २०१७ मध्ये न्यायालयाने घटस्फोटाची मंजूरी दिली होती. त्यांच्या घटस्फोटानंतर मुलगा अरहानची कस्टडी मलायकाकडे सोपवण्यात आली होती.
घटस्फोटानंतर अरबाजने मलायकाला किती पोटगी दिली होती?, याबाबत अनेक वृत्त समोर आले होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, मलायकाने अरबाजकडून घटस्फोटाच्या बदल्यात १० कोटी रुपयांची मागणी केली होती. तिला यापेक्षा कमी रुपये नको होते, त्यामुळे अरबाजने तिला तब्बल १५ कोटी रुपये पोटगी म्हणून दिले होते.
तरीही, याबाबत मलायका आणि अरबाज यांच्यापैकी कोणीही पोटगीसाठी दिलेल्या रकमेचा उल्लेख माध्यमांसमोर केला नाही. एकदा मलायकाचे वकील वंदना शाह यांनी एका पोर्टलशी बोलताना केवळ इतकेच म्हटले होते की, पोटगी हा खूपच गोपनीय विषय असतो, त्यामुळे यावर सार्वजनिकरीत्या कोणतेही वक्तव्य करणे योग्य होणार नाही.
घटस्फोटानंतर मलायका आपल्या नवीन घरामध्ये शिफ्ट झाली होती. तिचे घर बांद्रा येथील एका अपार्टमेंटमध्ये आहे. या अपार्टमेंटमध्ये ती आपला मुलगा अरहानसोबत राहते. अरहान आता १८ वर्षांचा झाला आहे.
याव्यतिरिक्त मलायकाच्या अफेअरबाबतही बऱ्याच चर्चा आहेत. ती सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. विशेष म्हणजे, मलायका आणि अर्जुन यांच्यात तब्बल १२ वर्षांचे अंतर आहे. तिचे वय ४७ आहे, तर अर्जुन ३५ वर्षांचा आहे.
मलायकाने आतापर्यंत अनेेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात ‘दबंग’, ‘हाऊसफूल’, ‘इंडियन’, ‘काल’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-गदरमध्ये ज्याने सनी-अमिषाच्या मुलाची भूमिका केली आता तोच होणार गदर दोनचा हिरो, पाहा कोण आहे ‘तो’