भारतीय सिनेसृष्टीतील जवळपास सर्वच कलाकार सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दलची माहिती त्यांच्या चाहत्यांना देत असतात. ते त्यांचे फोटो आणि व्हिडिओही शेअर करतात. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या नावाचाही समावेश आहे. मलायका तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा स्वॅगही तिच्या चाहत्यांना खूप आवडतो. मात्र, कधीकधी तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. अशातच आता ती पॅपराजींच्या कॅमेऱ्यात कैद झाली, तेव्हा तिला तिच्या लूकमुळे ट्रोल केले जात आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिचे एका इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करण्यात आले आहे. यामध्ये मलायका न्यूड रंगाच्या स्कीन टाईट कपड्यांमध्ये दिसत आहे. मलायका या लूकमध्ये नेहमीप्रमाणे फिट आणि ग्लॅमरस दिसत आहे. अशात एकीकडे तिची प्रशंसा केली जात आहे, तर दुसरीकडे तिला अनेक सोशल मीडिया युजर्स लूक न आवडल्यामुळे ट्रोल करत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एकीकडे मलायका अरोराचा हा लूक काही सोशल मीडिया युजर्सना आवडला आहे, तर दुसरीकडे तिला खूप ट्रोलही केले जात आहे. काही लोक मलायकाला ‘स्वस्त किम कार्दशियन,’ म्हणत आहेत. तसेच, अनेक सोशल मीडिया युजर्सनी अतिशय अश्लील कमेंट्स केल्या आहेत. मलायकाची ही स्टाईल सोशल मीडिया युजर्सना फारशी आवडली नाही.
मलायका अरोराचे मानधन
माध्यमांतील वृत्तांनुसार, मलायका अरोरा कोणत्याही आयटम नंबरसाठी खूप मोठी रक्कम घेते. रिपोर्टनुसार, मलायका एका आयटम नंबरसाठी जवळपास १.७५ कोटी रुपये घेते. मलायकाच्या फीवरून हे स्पष्ट झाले आहे की, अनेक अभिनेत्रींना संपूर्ण सिनेमांसाठी एवढी फी देखील मिळत नाही. त्याचवेळी, असे म्हटले जात आहे की, २०२१मध्ये मलायकाची एकूण संपत्ती ७३ कोटी रुपये होती, तर २०२२मध्ये तिची एकूण संपत्ती १०० कोटी रुपये झाली आहे.
रिलेशनशिपमध्ये आहे मलायका आणि अर्जुन
मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. ती अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याला डेट करत आहे. त्यांच्यात १२ वर्षांचं अंतर आहे. दोघांनीही पॅरिसमध्ये सुट्ट्यांची मजा घेतानाचे फोटो शेअर केले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-