बॉलिवूडची अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते. आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच जोडले राहावे म्हणून ती नवनवीन फोटो, व्हिडिओ शेअर करते. तिच्या पोस्ट इतक्या भन्नाट असतात की, त्यावर लाईक, कमेंट केल्याशिवाय चाहते स्वत:ला रोखू शकत नाहीत. अशातच आता अभिनेत्रीने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ भलताच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओवरही जबरदस्त प्रतिक्रिया आल्या आहेत.
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मलायका वर्कआऊट करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती मजेदार पद्धतीने प्लँक्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत तिची योगा प्रशिक्षका जाह्नवी पटवर्धनही दिसत आहेत. दोघीही व्हिडिओमध्ये अत्यंत सहजरीत्या प्लँक करताना दिसत आहेत. यांचा हा प्लँक व्हिडिओ पाहून तुम्हीही दंग व्हाल.
मलायकाने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “कुणी म्हटलं आहे का की, प्लँक्स मजेशीर नसतात? माझ्या आवडत्या जाह्नवी पटवर्धनसोबत.” मलायकाच्या व्हिडिओला आतापर्यंत १ लाख २० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.
डान्स एक्सरसाईझ व्हिडिओ
विशेष म्हणजे मलायका स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नेहमी योग आणि एक्सरसाईझ करते. यादरम्यानचे फोटो, व्हिडिओ ती पोस्ट करत असते. यापूर्वीही मलायकाने व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ती डान्स करताना दिसत होती.
अर्जुन कपूरसोबत डिनर डेट
सोशल मीडियावर सक्रिय राहण्याव्यतिरिक्त ती नेहमी जिमच्या बाहेर, तर कधी अभिनेता अर्जुन कपूरसोबत डिनर पार्टीवरही पाहायला मिळते. मलायका अर्जुनला डेट करत असल्यामुळे नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेतत असते. अर्जुन आणि मलायका अनेेकवेळा नाईट पार्टी किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये एकत्र दिसतात. या जोडीला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे, मलायकाचे वय ४७ आहे, तर अर्जुनचे वय ३५ आहे. म्हणजेच अर्जुन मलायकापेक्षा तब्बल १२ वर्षांनी लहान आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-माणुसकीचे उत्तम उदाहरण! मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने दिले घुबडाला जीवनदान; सर्वत्र होतंय कौतुक
-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर