अर्जुन कपूर लवकरच ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसणार आहे. सध्या तो त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अर्जुन कपूरने एका कार्यक्रमादरम्यान त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल सांगितले. यादरम्यान अभिनेता म्हणाला, ‘मी आता सिंगल आहे’. यानंतर मलायका आणि अर्जुनचे ब्रेकअप झाल्याचीही पुष्टी झाली. अर्जुन कपूरच्या या वक्तव्यानंतर दोन दिवसांनी मलायकाने एक क्रिप्टिक नोट शेअर केली आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून मीडियामध्ये फिरत होत्या. यावेळी मलायकाच्या बर्थडे पार्टीतही अर्जुन कपूर दिसला नाही. मात्र, दोन्ही स्टार्सनी याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. आता अलीकडेच, जेव्हा अर्जुन कपूरने ‘सिंघम 3’ च्या प्रमोशनदरम्यान सिंगल असल्याचे सांगितले तेव्हा मलायकासोबतचे त्याचे ब्रेकअप पुष्टी झाले.
मलायका अरोराने नुकतीच इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ‘कोणी एखाद्याच्या हृदयाला एका सेकंदासाठीही स्पर्श केला तर तो आयुष्यभरासाठी कोणाच्या तरी आत्म्याला स्पर्श करू शकतो’, असे लिहिले आहे. मलायकाने हे स्वतः सांगितले नसले तरी तिने कोणाचा तरी कोट शेअर केला आहे. पण, मलायकाच्या या पोस्टला अर्जुनच्या वक्तव्याशी जोडले जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
मला अमिताभ बच्चन यांनी घरी जेवायला बोलावले आणि मग; वरून धवनने सांगितला मजेदार किस्सा…