अर्जुन कपूरला फोनसाठी बोलणे मलायका अरोराला पडले भलतेच महागात, हेटर्सने धरलं धारेवर

0
655
Malaika Arora & Arjun Kapoor 2
Photo Courtesy: Instagram/malaikaaroraofficial & arjunkapoor

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. कधी बोल्ड फोटोंमुळे तर कधी प्रियकर अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सोबतच्या फोटोमुळे ती सगळ्यांचे लक्ष वेधत असते. मात्र कधी कधी तिला आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे ट्रोलिंगचा सामना सुद्धा करावा लागला आहे. आताही मलायका तिच्या एका फोटोमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. नेमके काय आहे या मागचे कारण चला जाणून घेऊ.

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून मलायका अरोराचे नाव घेतले जाते. पती अरबाज खानसोबत (Arbaaz Khan) घटस्फोट घेत, ती अभिनेता अर्जुन कपूरसोबत सध्या रिलेशनशीपमध्ये आहे. त्यांचे हे प्रकरण खूप दिवसांपासुन सुरू आहे. दोघेही याबद्दल अनेकदा जाहीर कबुली देताना दिसून आले आहेत. मलायका नेहमीच आपले बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. या फोटोंमुळे तिला अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो. मात्र यावेळी कोणताही ड्रेस, किंवा फोटो तिच्यावर होणार्‍या टीकेचे कारण नाही.

फिटनेस प्रिय असलेल्या मलायकाचा जिमसाठी जातानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मलायका रस्त्यावर चालताना मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे. याच कारणामुळे सध्या तिच्यावर जोरदार टीका केली जात आहे. कारण अभिनेत्री मलायका अरोराने अनेकदा माध्यमांसमोर बोलताना “मला अर्जुन कपूरची सतत मोबाईल वापरण्याची सवय अजिबात आवडत नाही” असे विधान केले होते. मात्र आता तीच मोबाईलवर व्यक्त असल्याची दिसताच हाच मुद्दा पकडत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. यावर अनेकांनी मलायकाला “आधी स्वतः बदल करायला शिका”असे म्हणत तिची खिल्ली उडवली आहे. तर काही जणांनी “मॅडम किती फोन वापरता तुम्ही?” असा प्रश्न विचारला आहे.

थोडक्यात मलायकाने अर्जुन कपूरला दिलेला सल्ला ती स्वतः मात्र विसरली आहे ज्यामुळे नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले आहे. तत्पूर्वी आपल्या फिटनेससाठी आणि फिगरसाठी प्रसिद्ध असलेल्या मलायकाने या फोटोतसुद्धा चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी पिवळ्या रंगाच्या ब्रालेटमध्ये ती खूपच मोहक दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
‘मला सलमानने नाही बनवले, मी स्वतः…’ जेव्हा मलायका अरोराने चिडून दिले होते स्पष्टीकरण
Video | अर्जुन कपूरला सोडून मलायका अरोरा करतीये शिव ठाकरेसोबत रोमान्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here