Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

रात्रीच्या वेळी अर्जुन कपूरच्या कपड्यांमध्ये दिसली मलायका, व्हेकेशनच्या फोटोंमध्ये झाला खुलासा

बॉलिवूडमधील रोमँटिक जोडप्यांपैकी एक असलेल्या मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी काही काळापूर्वीच आपले नाते अधिकृत केले आहे. हे दोघेही सध्या पॅरिसमध्ये आपल्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. विशेष म्हणजे, तिथेही हे जोडपे आपल्या चाहत्यांशी जोडले आहे. ते आपल्या फोटो शेअर करत आहेत. अर्जुनने २६ जून रोजी आपला वाढदिवस साजरा केला होता. यानिमित्ताने ते एकमेकांसोबत चांगला वेळ घालवत आहेत. मात्र, आता त्यांच्या एका फोटोने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

या पोस्टमध्ये एक फोटो आहे आणि एक व्हिडिओ क्लिप आहे. एका फोटोत अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याने हुडी परिधान केली आहे, तर दुसरीकडे तीच हुडी मलायका अरोरा (Malaika Arora) हिने परिधान केल्याचे दिसत आहे. अर्जुनने कॅप्शनमध्ये या गोष्टीचा उल्लेखही केला आहे.

अर्जुन कपूरची पोस्ट
अर्जुन कपूर याने त्याही ही पोस्ट शेअर करत खास कॅप्शनही दिले आहे. त्याने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “दिवसा माझे आणि रात्री तिचे.” या कॅप्शनसह त्याने हॅशटॅगमध्ये जंपर शेअर करणे, केअर करण्यासारखे आहे असे लिहिले आहे. यावर मलायकानेही कमेंट करत “हाहाहा… सापडली,” असे लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) 

हे देखील वाचा