Monday, July 15, 2024

लॉस एंजेलिसमध्ये मल्लिका शेरावत जगतेय लक्झरी आयुष्य, घराचे व्हिडिओ पाहून चाहतेही झाले हैराण

‘मर्डर’ चित्रपटातून आपल्या अभिनयाने आणि बोल्डनेसने सर्वांच्या मन जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत. मर्डर चित्रपटातील तिच्या अभिनयाची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. ती आधीपासूनच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीला वेगवेगळी पात्र निभावली आहेत. मल्लिका शेरावत ही चित्रपटसृष्टीपासून लांब आहे पण सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिने सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिच्या व्हिलाची झलक दाखवली आहे.

मल्लिका (mallika sherawat) हिने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्हिडिओच्या सुरुवातीला मल्लिका दरवाज्यातून बाहेर येत. दाराच्या बाहेर तिचा कुत्रा उभा असतो. यांनतर ती तिच्या कुत्र्याला म्हणते की, “चल स्विमिंग पूलकडे जाऊ.” ती स्विमिंग पूलकडे जाते आणि पाण्यात खेळताना दिसते. ती पायाने कुत्र्याच्या अंगावर उडवत आहे.

मल्लिकाच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. तिचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “व्वा! काय सुंदर घर आहे.” दुसऱ्या एका युजरने कमेंट केली आहे की, “मल्लिका तुझे घर खूपच सुंदर आहे.” या व्हिडिओमधून हे स्पष्ट दिसत आहे की, मल्लिका तिचे आयुष्य खूप एन्जॉय करत जगत आहे.

मल्लिका जवळपास अडीच महिन्यांपासून लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे. ती तिच्या घराबाहेरील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. 2013 मध्ये मल्लिकाने ती लॉस एंजेलिसला शिफ्ट होणार असल्याचे वक्तव्य केले होते.

https://www.instagram.com/p/CPM4o5Op3jR/?utm_source=ig_web_copy_link

मल्लिकाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी माझ्या वेळेत लॉस एंजेलिस अमेरिका, भारत यांच्यामध्ये विभागले होते. आता मी अमेरिकेत सामाजिक स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे. मी जेव्हा भारतात जाते आणि तेथील लोकांचे महिलांबद्दल विचार ऐकते, तेव्हा एक स्वतंत्र महिला असल्याने हे ऐकून खूप दुःख होते.”

https://www.instagram.com/p/CMwFW9-JpyU/?utm_source=ig_web_copy_link

तिच्या आता पर्यंतच्या प्रवासाबाबत एका मुलाखतीत सांगितले की, “मी काम मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ऑडिशनशिवाय मी एकही चित्रपट केला नाहीये. एवढचं काय तर जॅकी चॅनसोबतचा माझा चित्रपट मिथमध्ये मला असाईन करण्याआधी अनेक अभिनेत्रींचे ऑडिशन घेतले होते. जेव्हा रजतने त्याच्या आगामी चित्रपटासाठी मला विचारले, तेव्हा त्याने माझी प्रॉपर लूक टेस्ट आणि स्क्रीन टेस्ट घेतली होती. त्याने हे देखील सांगितले होते की, त्यांना जर हे आवडले नाही तर ते मला चित्रपटात घेणार नाही.”

मल्लिकाने तिच्या करिअरची सुरुवात टीव्हीवरील जाहिरातींमधून केली होती. यांनतर ती ‘जीना सिर्फ मेरे लिये’ या चित्रपटात एका छोट्या भूमिकेत दिसली होती. तिने ‘ख्वाहिश’, ‘मर्डर’, ‘प्यार के साईड इफेक्ट्स’ या चित्रपटात काम केले यांनतर तिला खरी ओळख मिळाली. ती शेवटची ‘बू सबकी फटेगी’मध्ये दिसली होती. तसेच ती रजत कपूरच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

हे देखील वाचा