Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड बोल्ड अँड ब्युटीफुल! मल्लिकाने पूलमध्ये दाखवला किल्लर अंदाज, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘वय फक्त आकडा’

बोल्ड अँड ब्युटीफुल! मल्लिकाने पूलमध्ये दाखवला किल्लर अंदाज, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘वय फक्त आकडा’

सन २००४मध्ये प्रदर्शित झालेला ‘मर्डर‘ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमात अभिनेता इमरान हाशमी आणि अभिनेत्री मल्लिका शेरावत यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या सिनेमात बोल्ड सीन चित्रीत करून दिग्दर्शक अनुराग बासू यांनी त्यावेळी उदाहरण तयार केलं होतं. यामध्ये इमरानसोबत एकापेक्षा एक बोल्ड आणि इंटीमेट सीन देऊन अभिनेत्री मल्लिका रातोरात सेन्सेशन बनली होती. यानंतरही तिने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. मात्र, ही अभिनेत्री आता तिचे सिंगल आयुष्य जगत आहे.

अभिनेत्रीने दाखवला हॉट अंदाज
अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) ही सिनेमांपासून सध्या दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय आहे. अभिनेत्रीने आता तिच्या चाहत्यांसोबत हॉट अंदाज शेअर केला आहे. विशेष म्हणजे, काळानुसार मल्लिकादेखील आणखीच बोल्ड होत चालली आहे. त्यामुळे तिने तिच्या व्हिडिओने पुन्हा चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मल्लिकाचा लेटेस्ट व्हिडिओ
मल्लिकाने नुकताच इंस्टाग्राम अकाऊंटवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने लाल आणि पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. व्हिडिओत दिसते की, मल्लिका पूलमध्ये (Mallika Sherawat Pool) उभी आहे. तिने यादरम्यान सनग्लासेस लावले आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला ती केस बांधताना दिसते. यानंतर जसा व्हिडिओ सुरू होतो, ती आपले केस मोकळे सोडते आणि मस्तीच्या अंदाजात वावरू लागते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) 

हे देखील वाचा