दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेली अभिनेत्री, गायिका, निर्माती ममता मोहनदास सर्वांना माहिती असेलच. ममताने तिच्या प्रतिभेमुळे संपूर्ण देशात तिचे फॅन्स तयार केले आहेत. नेहमी आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असणारी ममता तिच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ममताने तिच्या पोस्टमधून सध्या तिला झालेल्या एका गंभीर आजाराबद्दल सांगितले आहे. या पोस्टमधून तिने तिला झालेल्या एका नवीन आजाराचा खुलासा केला असून, तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
ममताने तिचे काही फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये ती गार्डनमध्ये बसून ब्लॅक टी घेताना दिसत आहे. तिने काळया रंगाचा टीशर्ट आणि जॅकेट घातले आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, “डियर सन, मी आता तुला मिठी मारते, अशी मिठी मी यापूर्वी कधीच मारली नाही. माझ्या चेहऱ्यावर बरेच डाग आहेत, मी माझा रंग गमावत आहे. मी सकाळी तुझ्या आधी उठते. धुक्यातून तुझे पहिले किरण निघताना पाहण्यासाठी. तुझ्याकडे जे काही आहे ते सर्व मला दे… तुझ्या कृपेने मी कायमच तुझी ऋणी आहे. आजपासून कायमची,” या फोटोंसोबत तिने कलर, ऑटोइम्यून डिसिज, विटिलिगो, सनलाइट असे हॅशटॅग देखील दिले आहेत.
View this post on Instagram
तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी तिला पावरफुल स्त्री म्हटले आहे. यासोबतच तिला फायटर, प्रेरणादायी देखील म्हणत तिची हिंमत वाढवली आहे. यासोबतच तिच्या इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार मित्रमैत्रिणी देखील यावर कमेंट्स करत तिला प्रोत्साहन दिले आहे. दरम्यान विटिलिगो हा एक त्वचेसंदर्भातला आजार असून, यामध्ये आजारी व्यक्तीच्या त्वचेचा रंग उडू लागतो. त्या व्यक्तीच्या शरीरावर पांढरे डाग दिसू लागतात आणि ते वाढत जातात.
तत्पूर्वी ममता मोहनदासला ही मल्याळम अभिनेत्री असून कॅन्सर सर्व्हायव्हर आहे. काही वर्षांपूर्वी तिला स्तनांचा कर्करोग झाला होता. त्यानंतर तिने अमेरिकेत उपचार घेतले आणि ती बरी झाली होती. ममताने २००५ साली मल्याळम सिनेमा ‘मयूखम’ मधून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. तिने अनेक मल्याळम चित्रपटांमध्ये अभिनय केला असून, कन्नड, तेलगू, तामिळ चित्रपटांची निर्मिती केली आहे. तिला अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“खोटे गोड बोलण्यापेक्षा कडू सत्य बोला”; केतकीनं चाहत्यांना दिल्या काटेरी शुभेच्छा
हॅपी मंकरसंक्रात! अमृता फडणवीसांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद, पाहा भन्नाट व्हिडिओ