लग्नानंतर पहिली दिवाळी साजरी करणाऱ्या मानसी नाईकने पतीसोबत पारंपरिक वेशभूषेत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

 

आपल्या सगळ्यांचा आवडता दिवाळी सण सुरू झाला असून, गुरुवारी (४ नोव्हेंबर) लक्ष्मी पूजनाच्या सण साजरा होत आहे. यानिमित्त अनेक कलाकार सोशल मीडियावर त्यांचे पारंपारिक लूकमधील फोटो शेअर करून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, त्यांच्या घरातील दिवाळीचे फोटो शेअर करत आहेत. अशातच नवविवाहित जोडपे मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा हे त्यांची लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करत आहेत. यानिमित्त मानसी नाईकने त्यांचे काही फोटो शेअर करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मानसीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून पतीसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघेही पारंपारिक पोशाखात दिसत आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, मानसीने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी आणि चंदेरी रंगाचा ब्लाऊज घातले असून, नाकात शाही नथ घातली आहे. यासोबत केसांमध्ये गजरा माळून कपाळाला चंद्राची कोर लावली आहे. तसेच तिच्या पतीने चंदेरी रंगाचा कुर्ता आणि त्यावर जांभळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. या फोटोमध्ये ते दोघे वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Actress Manasi naik share a photo with her husband and give best wishes of diwali)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “कुमकुम भरे कदमों से लक्ष्मीजी आये आपके द्वार, सुखसमृद्धी मिले अपको अपरमपार. इस दिवाळीपर माता लक्ष्मीजी आपकी सभी तमन्नाये करे स्वीकार, शुभ दीपावली.” तिने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यांचा हा मराठमोळा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तसेच अनेकजण त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत

.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

तब्बूला पाहून जेव्हा ‘या’ अभिनेत्याचा सुटला स्वतःवरचा ताबा, आजही तिच्या आठवणीत आहे ‘तो’ किस्सा

तर ‘अशा’ पद्धतीने घातली विकी कौशलने कॅटरिना कैफला लग्नाची मागणी

लग्नानंतर साजऱ्या होणाऱ्या पहिल्या दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीने केली खास तयारी शेअर केला व्हिडिओ