Tuesday, July 9, 2024

लग्नानंतर पहिल्यांदाच मानसी नाईकने साजरी केली हरियाली तीज; हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये अप्रतिम दिसतंय दाम्पत्य

मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची नायिका आणि डान्सर म्हणजे मानसी नाईक. मानसी नाईकने अनेक गाण्यांवर डान्स करून तिची एक वेगळीच छाप पाडली आहे. मराठीमधील ‘आयटम गर्ल’ अशी तिची सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप व्यस्त आहे. याच वर्षी मानसीचे लग्न झाले आहे. त्यामुळे सध्या तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या पतीसोबत फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत असतात. त्या दोघांचा रोमँटिक अंदाज तिच्या चाहत्यांना खास पसंत पडत असतो. अशातच तिचे नवीन काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

मानसीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा पती प्रदीप खरेरासोबत काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते दोघेही अत्यंत खुश दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मानसीने हिरव्या रंगाचा टॉप आणि प्लाझो परिधान केला आहे. यासोबत तिने मॅचिंग ओढणी घेतली आहे. हातात चुडा आणि मोठे इअरिंग घातले आहे. तसेच तिने मेहेंदी देखील काढलेली दिसत आहे. सिंदूर देखील लावलेला दिसत आहे. या आऊटफिटमध्ये ती अप्रतिम दिसत आहे. तसेच तिचा पती म्हणजेच प्रदीप खरेरा याने देखील हिरव्या रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. या फोटोमध्ये त्या दोघांची केमिस्ट्री खूपच सुंदर दिसत आहे. (manasi naik share a photos with her husbund pradeep kharera)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मेरा मन झूम झूम नाचे गाए तिज के हरियाली गीत, आज पिया संग झुलेंगे, संग में मनाएंगे हरियाली तीज. हरियाली तीज २०२१ की बधाई.” त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. मानसीची लग्नानंतरची ही पहिलीच तीज आहे.

मानसीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने चित्रपटात आणि गाण्यात डान्स केला आहे. तिने ‘जबरदस्त’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘टारगेट’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’, ‘असं वाजवा की’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमध्ये डान्स केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी पूर्ण केले वचन; बिग बींचा ‘चेहरे’ ‘या’ दिवशी चित्रपटगृहात होणार रिलीझ

-कंगना रणौतने शेअर केले बोल्ड लूकमधले फोटो; युजर्स म्हणाले, ‘तू दुसऱ्यांच्या पोस्टवर…’

-मुली जान्हवी अन् खुशीसाठी खूपच पझेसिव्ह होत्या श्रीदेवी; तर लग्नानंतर ‘या’ कारणामुळे गेल्या त्या चित्रपटसृष्टीपासून लांब

हे देखील वाचा