Monday, June 23, 2025
Home मराठी पहिली करवाचौथ साजरी करणाऱ्या मानसी नाईकचे फोटो पाहून ‘या’ अभिनेत्रीने केले तिच्या लूकचे कौतुक

पहिली करवाचौथ साजरी करणाऱ्या मानसी नाईकचे फोटो पाहून ‘या’ अभिनेत्रीने केले तिच्या लूकचे कौतुक

मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. काही महिन्यांपूर्वी ती लग्न बंधनात अडकलली. यानंतर ती चित्रपटात जास्त दिसली नाही, परंतु सोशल मीडियावर मात्र ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. दररोज न चुकता ती तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिने करवा चौथ निमित्त काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मानसी नाईकने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने सगळा साजशृंगार केला आहे. हे फोटो तिने खास करवा चौथ निमित्त शेअर केले आहेत. फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने लाल रंगाची अत्यंत सुंदर अशी साडी नेसली असून, यावर तिने गळ्यात मंगळसूत्र, लाल रंगाचा हार, कानात ईअरिंग आणि कपाळी लाल रंगाची टिकली लावली आहे. ती हातात चाळणी घेऊन पोझ देत आहे. तसेच तिने हातात खूप सुंदर लाल रंगाचा चुडा घातला आहे. यासोबतच हातावर सुंदर अशी मेहेंदी काढलेली दिसत आहे. (Actress Manasi naik share her beautiful photos on social media)

हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “व्रत रखा है मैने, बस एक प्यार सी ख्वाहिश के साथ. हो लंबी उम्र तुम्हारी और हर जन्म मिले हमे एक दुसरे का साथ. करवा चौथ की हार्दिक बधाई.” तिचा हा लूक अनेकांना खूप आवडला आहे. तिच्या या फोटोवर अभिनेत्री दिपाली सय्यद हिने कमेंट केली आहे की, “किती गोड दिसतेस मनू.” यासोबत तिचे अनेक चाहते या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट करत तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत.

मानसी नाईकने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिचा पती प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तसेच तो एक अभिनेता आणि मॉडेल आहे.

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीचा सुरूये वाद? पतीशिवाय अभिनेत्री गेली कौटुंबिक ट्रिपला

गुलाबी साडीत कमाल दिसतेय रिंकू, अभिनेत्रीच्या पारंपारिक लूकने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

सेटवरील गोळीबारात झालेल्या मृत्यूमुळे प्रियांका झालीय दुःखी, आपल्या भावना शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा