Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड राज अन् मंदिराच्या लग्नाचे २३ वर्षे; अभिनेत्रीने फोटो शेअर करत लिहिली भावुक पोस्ट

राज अन् मंदिराच्या लग्नाचे २३ वर्षे; अभिनेत्रीने फोटो शेअर करत लिहिली भावुक पोस्ट

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पतीच्या जाण्यामुळे मंदिरा बेदीला मोठा धक्का बसला होता. राज यांच्या निधनानंतर मंदिरा पूर्णपणे कोलमडली होती. तिने स्वतः ला बाहेरच्या जगापासून आणि सोशल मीडियापासून दूर केले होते. मात्र, आता हळूहळू मंदिरा पुन्हा सोशल मीडियावर ती परतली आहे, बाहेर फिरताना देखील तिला स्पॉट केले गेले.

बुधवारी (१४ जुलै) मंदिरा बेदीने काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो त्यांच्या सुट्ट्यांचे आणि लग्नवाढदिवसाचे असल्याचे दिसते. आजच्या दिवशी मंदिराने राज यांना आठवत सोशल मीडियावर एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये तिने तिचे राजसोबतचे तीन फोटो पोस्ट केले असून सोबत लिहिले आहे की, “एकमेकांना ओळखून आपल्याला २५ वर्ष आणि लग्नाला २३ वर्ष पूर्ण झाले. सर्व संघर्षातून जाणारे, प्रत्येक यश, अपयशातून जाणारे…!” आज मंदिराच्या लग्नाला २३ आर्ष पूर्ण झाले, तर त्यांना एकमेकांना ओळखून २५ वर्ष पूर्ण झाली आहेत.

मंदिराच्या या पोस्टवर फॅन्ससोबतच इंडस्ट्रीमधील तिच्या सर्व सहकलाकार, मित्रमैत्रिणींनी कमेंट्स केल्या आहेत. यात मौनी रॉय, अरमान मलिक, शक्ति मोहन, आशका गोराडिया, आशिष चौधरी, हंसिका मोटवानी, अर्जुन बिजलानी, आयेशा श्रॉफ, किश्वर मर्चंट आदी अनेक कलाकारांचा समावेश आहे.

याआधी देखील मंदिराने पती राज कौशल यांच्या आठवणीत इंस्टाग्रामवर मध्यरात्री एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एक फोटो शेअर केला असून, या फोटोमध्ये तिने एका टिश्यू पेपरवर ‘राजी’ असे लिहिले आहे, तर फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये मंदिराने “मिस यू राजी” असे लिहित पुढे तुटलेल्या हार्टचे इमोजी वापरले आहे.

मध्यरात्री केलेल्या या पोस्टवरून पतीच्या निधनानंतर मंदिरा किती मोठ्या प्रमाणात खचली आहे आणि यामुळे तिला झोप येणे देखील किती अवघड झाल्याचे लक्षात येते. मंदिराच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

मंदिराचे पती आणि चित्रपट निर्माता राज कौशलचे ३० जून रोजी निधन झाले. १९९९ मध्ये राज आणि मंदिरा यांनी लग्न केले होते. लग्नाच्या १२ वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला. त्यानंतर २०२० मध्ये त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा