Saturday, July 6, 2024

मंदिरा बेदीने मारले ३३ हँडस्टँड, अभिनेत्रीचा वर्कआउट व्हिडिओ पाहून चाहते झाले अवाक्!

बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी ग्लॅमर आणि फिटनेस विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने तिच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे. परंतु तिचा बिनधास्त अंदाज तिला चित्रपटसृष्टीतील सर्वात बोल्ड व्यक्तिमत्त्वांच्या यादीत उभा करतो. मंदिरा बेदी अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. जी केवळ स्वत:ला तंदुरुस्त ठेवत नाही, तर इतरांनाही ‘फिट अँड फाईन’ राहण्यासाठी जागरूक करत असते. आयुष्यात कठीण प्रसंग आले, तरी मंदिरा बेदीने हार मानली नाही. पतीच्या निधनानंतर तिने स्वत:ला आणि कुटुंबाला ज्या पद्धतीने हाताळले, त्यावरून ती मानसिकदृष्ट्या किती खंबीर आहे, हे लक्षात येते. आता ती पुन्हा तिचे आयुष्य सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहे. ती पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. अशातच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

व्हिडिओ पाहून चाहते झाले आश्चर्यचकित
या व्हिडिओमध्ये मंदिरा एक्सरसाइज करताना दिसत आहे. तसे, ती अनेकदा तिचे एक्सरसाइजचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करते. पण या व्हिडिओची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने एकाच वेळी ३३ हँडस्टँड केले आहेत, हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. विश्वास बसत नसेल, तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करत मंदिराने कॅप्शन लिहिले की, “तुम्हा सर्वांना सुप्रभात. ऑनवर्ड्स, अपवर्ड्स आणि त्यासह अपसाइड डाउनवर्ड्सही. आज मी ३३ हँडस्टँड केले. हे सलग ११ होते.” तिच्या या व्हिडिओला १२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

मंदिराने यापूर्वीही असे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओमध्ये मंदिरा १००० स्क्वॉट्स करताना दिसली होती. व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज सकाळी मी उठले आणि विचार केला की, आज मला १ हजार स्क्वॅट्स करायचे आहेत.”

फिटनेसबाबत राहते जागरुक
मंदिरा बेदी तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. व्यक्ती कोणत्याही वयात स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकतो, असे मंदिराचे मत आहे. त्यासाठी फक्त इच्छाशक्ती असायला हवी.

मंदिरा बेदीने १९९४ मध्ये ‘शांती’ या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर १९९५ मध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तिने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. यासोबतच मंदिरा अनेक वेबसीरिजमध्येही दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा

-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ

-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल

हे देखील वाचा