Friday, August 1, 2025
Home मराठी किती गोड! सोज्वळ मयुरीचा ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना भुरळ, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

किती गोड! सोज्वळ मयुरीचा ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना भुरळ, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

कलाकार त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांत तसेच मालिकांमध्ये काम करतात. मात्र, त्यांच्या कारकिर्दीत एखादी अशी मालिका किंवा चित्रपट येतो आणि त्याने कलाकारांना इतकी ओळख मिळते की, ते आयुष्यभरासाठी ती मालिका त्यांच्या नावी होऊन जाते. अशीच झी मराठीवरील एक गाजलेली मालिका म्हणजे ‘खुलता कळी खुलेना’ होय. या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख होती.

तसं पाहायला गेलं, तर या आधी मयुरीने इतर मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. मात्र, या मालिकेतील तिचे पात्र आणि अभिनय प्रेक्षकांच्या खास पसंत पडला होता. तिच्या मानसी नावाच्या पात्राने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्यात तिचा तो निरागस चेहरा आणि गोड स्माईल यामुळे तर ती सर्वांचे आकर्षण बनली होती. आजही प्रेक्षकांमध्ये तिची तेवढीच क्रेझ आहे. अशातच तिचा ग्लॅमरस लूक समोर आला आहे. (Actress mayuri Deshmukh share her glamorous photos on social media)

मयुरीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे एक फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती नेहमीपेक्षा खूप ग्लॅमरस दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचा बॉडी फिटेड शॉर्ट ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. यासोबत तिने कानात मोठे रिंग्स घातले आहेत आणि मिडल पार्टेशन करून केस मोकळे सोडले आहेत. या सगळ्यात तिच्या गालावरील खळी तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पाडत आहे.

तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या या फोटोला आतापर्यंत २० हजारांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज खूप आवडला आहे.

मयुरीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिज्ञा भावे होती. मालिकेतील तिची मानसी नावाची भूमिका चांगलीच गाजली होती. तसेच तिने ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’, ‘३१ दिवस’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या स्टार प्लस या वाहिनीवरील ‘इमली’ या मालिकेत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुरूची शनाया गुपचूप अडकली लग्नबंधनात, १५ दिवसांनंतर चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

-‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अवतरणार अक्षय कुमार, पाहायला मिळणार खिलाडीचा मराठमोळा अंदाज

-भारीच की! ‘ही’ अभिनेत्री असणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री

हे देखील वाचा