कलाकार त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांत तसेच मालिकांमध्ये काम करतात. पण त्यांच्या करिअरमध्ये एखादी अशी मालिका किंवा चित्रपट येतो आणि कलाकारांना इतकी ओळख देऊन जातो की, आयुष्यभरासाठी ती मालिका त्यांच्या नावी होऊन जाते. अशीच झी मराठीवरील एक गाजलेली मालिका म्हणजे ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख होती.
तसं पाहायला गेलं तर या आधी मयुरीने इतर मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. पण या मालिकेतील तिचे पात्र आणि अभिनय प्रेक्षकांच्या खास पसंत पडला होता. तिच्या मानसी नावाच्या पात्राने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्यात तिचा तो निरागस चेहरा आणि गोड स्माईल यामुळे तर ती सर्वांचे आकर्षण बनली होती. आजही प्रेक्षकांमध्ये तिची तेवढीच क्रेझ आहे. अशातच तिचा ग्लॅमरस लूक समोर आला आहे. (Actress mayuri Deshmukh’s glamorous look viral on social)
मयुरीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही ग्लॅमरस फोटोसमोर आले आहेत. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा बॉडी फिटेड लाँग ड्रेस परिधान केला असून, त्यावर पायात काळ्या रंगाचे शूज घातले आहेत. तसेच तिने सगळे केस मोकळे सोडले आहेत. या ड्रेसवर तिने लावलेली गडद लाल रंगाची लिपस्टिक खूपच उठून दिसत आहे. त्यामुळे तिचा हा लूक खूपच आकर्षक दिसत असून, या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोज देत आहेत. तसेच या ड्रेसमधील तिने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. एका चाहत्याने या फोटोवर “नैसर्गिक सौंदर्य” अशी कमेंट केली आहे. तसेच एका चाहत्याने “बेबी” अशी कमेंट केली आहे. अशाप्रकारे या फोटोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मयुरीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत काम केले आहे. तसेच तिने ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’, ‘३१ दिवस’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या स्टार प्लस या वाहिनीवरील
‘इमली’ या मालिकेत काम करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीचा सुरूये वाद? पतीशिवाय अभिनेत्री गेली कौटुंबिक ट्रिपला
–गुलाबी साडीत कमाल दिसतेय रिंकू, अभिनेत्रीच्या पारंपारिक लूकने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके
–सेटवरील गोळीबारात झालेल्या मृत्यूमुळे प्रियांका झालीय दुःखी, आपल्या भावना शेअर करत म्हणाली…