Monday, July 1, 2024

पाकिस्तानी अभिनेत्रीला ब्राच्या रंगावरून युजर्सनी केले ट्रोल; कंटाळून म्हणाली, ‘माझ्या ब्राच्या रंगाशी तुमचं…’

अनेक कलाकार हे एखाद्या वादग्रस्त मुद्द्यावर प्रतिक्रिया दिल्याने चर्चेत असतात. एखाद्या विषयावर त्यांनी त्यांचे मत मांडल्यानंतर विरोधकांना अथवा दुसऱ्या व्यक्तींना ते आवडत नाही. त्यामुळे त्यांच्यावर जहरी टीका होते. कलाकारांच्या चर्चेचे विषय त्यांचे कपडे, त्यांचे राहणीमान, त्यांची भाषा व कौटुंबिक आयुष्य हे असतात. अनेक अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरून टीकेचा सामना करावा लागतो. असाच काही प्रकार पाकिस्तानमधील अभिनेत्री मेहविश हयात बरोबर झाला आहे.

मेहविश ही पाकिस्तान मधील २०१९च्या टॉप टेन सेक्सिएस्ट एशियन फिमेलमध्ये नवव्या क्रमांकावरील सुंदर अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने १४ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देत एक फोटो शेअर केला होता. (Actress mehwish hayat hits back at trolls for debating on colour of her bra)

मेहविशने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये असं म्हटलं की, “फक्त आपला राष्ट्रीय ध्वज फडकावून उपयोग नाही. जर नागरिक आपल्या स्वप्नामधील या पाकिस्तानला प्रत्यक्षात तसं बनवू इच्छित असतील, तर आपल्या पूर्वजांचा आदर्श घेणे गरजेचे आहे.”

युजर्सनी तिचा हा संदेश ऐकायचे सोडून तिच्या ब्राच्या रंगावरून तिला ट्रोल करायला सुरुवात केली. आपण फोटोमध्ये बघू शकता की, तिने स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. कुर्ता पातळ व सफेद रंगाचा असल्याने तिने परिधान केलेली वेगळ्या रंगाची ब्रा त्यामधून दिसत आहे. यावरून तिला खूप मोठ्या कमेंट्स करत जास्त ट्रोल केले जात होते. तसेच तिला व्यवस्थित कपडे घालत जा, असंही अनेकांनी सांगितलं आहे.

या ट्रोलर्सना उत्तर देत अभिनेत्री मेहविशने लिहिले आहे की, “काही लोकांच्या कमेंट्स पाहून मला वाईट वाटते. काळा, पांढरा, हिरवा माझ्या ब्राच्या कोणत्याही रंगाशी तुमचं काहीच घेणं देणं नाही. अल्लासाठी तरी असं करू नका. मी तुम्हाला असा सल्ला देऊ इच्छिते की, आपल्या देशात इतरही समस्या आहेत. तुम्ही तुमची ताकत तिकडे वापरा.”

मेहविशचा जन्म ६ जानेवारी, १९८३ रोजी पाकिस्तानमधील कराची येथे झाला होता. ती एक उत्तम व यशस्वी अभिनेत्री आहे. आपल्या प्रत्येक फोटोशूटचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण मेहविश तीच अभिनेत्री आहे, जिचं नाव दाऊदबरोबर जोडलं गेलं होतं.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ऍव्हेंजर्स: एंडगेम’ फेम स्कारलेट जोहान्सनच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन; पतीने पोस्ट शेअर करत सांगितले नाव

-‘वंडर वुमन’ गॅल गॅडोटने सेटवरून केले ब्रेस्ट मिल्क पंपचे फोटो शेअर; निभावतेय दुहेरी भूमिका

-आहा…कडकच ना! ऐश्वर्याने चुलत बहिणीच्या लग्नात लावले जोरदार ठुमके; अभिषेक अन् आराध्यानेही दिली साथ

हे देखील वाचा