मराठीपासून ते बॉलिवूडपर्यत काम करून सर्वत्र लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर होय. मिथिला तिच्या बोल्ड लूकसाठी सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. तिची आणखी एक ओळख म्हणजे तिचे दाट कुरळे केस. मिथिलाने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम करून तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. सध्या ती चित्रपटात जास्त दिसत नसली, तरीही सोशल मीडियावर मात्र मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक बोल्ड फोटोशूट ती सोशल मीडियावर शेअर करते. पण या वेळेस तिने तिचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.
मिथिलाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती खूपच गोड दिसत आहे. तिने फिकट गुलाबी रंगाची साडी नेसलेली आहे. या साडीवर हिरव्या आणि पांढऱ्या रंगाची फुले दिसत आहेत. तसेच कानात मोठे इअरिंग घातले आहेत. ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे. (actress mithila palakar’s saree look viral on social media)
मिथिलाने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. नेहमीच बोल्ड लूकमध्ये दिसणाऱ्या मिथिलाला या साडीमध्ये पाहून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने “अप्रतिम सौंदर्य” अशी कमेंट केली आहे, तर दुसऱ्या एका चाहत्याने “अगं आवर गं” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने “आंखियों से गोली मारे लडकी कमाल रे” अशी कमेंट केली आहे. तिचा हा साडीतील लूक सर्वांनाच खूप आवडला आहे. (actress mithila palakar’s saree look viral on social media )
मिथिलाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती मागील काही दिवसात ‘त्रिभंगा’ या चित्रपटात काजोलसोबत स्क्रीन शेअर करत होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला भरभरून दाद मिळाली होती. सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी मिथिला ही एक आहे. मिथिलाने तिच्या करिअरची सुरुवात ‘वरुण नार्वेकर’ यांच्या ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटातून केली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांनी काम केले आहे. यासोबतच तिने २०१४ मध्ये ‘माझा हनिमून’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.
तिने २०१८ मध्ये इरफान खानसोबत ‘कारवां’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील या दोघांच्या आंबट गोड केमिस्ट्रीने सगळ्यांना खूप हसवले तसेच भावनिक देखील केले. तसेच तिने ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात देखील काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘इथे सूर्यप्रकाश येतोय…’, म्हणत अनन्या पांडेने शेअर केले घायाळ करणारे ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ फोटोशूट
-कंगनासोबत ब्रेकअपनंतर तुटून गेला होता अध्ययन; वडील शेखर यांच्या ‘या’ सल्ल्याने दिली त्याला हिंमत