Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड मिथिला पालकरचा स्टायलिश लूक घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, हटके पोझने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

मिथिला पालकरचा स्टायलिश लूक घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, हटके पोझने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

मिथिला पालकर हिचा समावेश मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत होतो. पारंपारिक लूकपासून ते अगदी बोल्ड लूकपर्यंत ती प्रेक्षकांना तिचा जलवा दाखवत असते. तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रतिसाद मिळत असतो. मागील काही दिवसांपासून मिथिला सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अनेक बोल्ड फोटोशूट ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा फॅशन सेन्स देखील अनोखा आहे. त्यामुळे तो सोशल मीडियावर नेहमीच लक्षवेधी स्टाईल आयकॉन ठरत असते. अशातच तिचे एक नवीन फोटोशूट समोर आले आहे.

फिल्मफेअरने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मिथिलाचा एक स्टायलिश फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मिथिला नेहमी प्रमाणेच अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. तिने लाल रंगाचा क्रॉप-टॉप आणि लाल रंगाची पँट परिधान केली आहे. तिच्या पँटच्या मध्ये वेगळ्या रंगाचा पॅच लावलेला दिसत आहे. त्यामुळे तिचा हा ड्रेस आणखीनच आकर्षक दिसत आहे. तिने तिचे कुरळे केस मोकळे सोडले आहेत. तसेच पायात काळ्या रंगाचे पेन्सिल हील्स घातले आहेत. ती खाली एका पायावर बसून पोझ देताना दिसत आहे. (Actress mithila palkar’s new photo viral on social media)

मिथिलाचा चाहतावर्ग भरपूर असल्याने तिचे फोटो व्हायरल व्हायला सहसा वेळ लागत नाही. हा फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर देखील शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने “ऐसा स्क्वॅट चलेगा क्या,” असे कॅप्शन दिले आहे. इंस्टाग्रामवर तिच्या या फोटोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तिच्या या फोटोला आतापर्यंत एक लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.

मिथिलाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती मागील काही दिवसात ‘त्रिभंगा’ या चित्रपटात काजोलसोबत स्क्रीन शेअर करत होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला भरभरून दाद मिळाली होती. सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी मिथिला ही एक आहे. मिथिलाने तिच्या करिअरची सुरुवात वरुण नार्वेकर यांच्या ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटातून केली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांनी काम केले आहे. यासोबतच तिने २०१४ मध्ये ‘माझा हनिमून’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुरूची शनाया गुपचूप अडकली लग्नबंधनात, १५ दिवसांनंतर चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

-‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अवतरणार अक्षय कुमार, पाहायला मिळणार खिलाडीचा मराठमोळा अंदाज

-भारीच की! ‘ही’ अभिनेत्री असणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री

हे देखील वाचा