Wednesday, January 21, 2026
Home मराठी भारीच की! मॉर्डन लूकनंतर आता मिथिला पालकरच्या पारंपारिक लूकचा सोशल मीडियावर धुमाकूळ

भारीच की! मॉर्डन लूकनंतर आता मिथिला पालकरच्या पारंपारिक लूकचा सोशल मीडियावर धुमाकूळ

सध्या सोशल मीडिया हे सर्वांच्या हक्काचे स्थान झाले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा खुलासा करत असतात. मराठी तसेच बॉलिवूड अभिनेत्री मिथिला पालकर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. याआधी मिथिलाने तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अशातच तिचे काही पारंपारिक लूकमधील फोटो समोर आले आहेत, ज्या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

मिथिलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने साडी नेसलेली आहे. तिने निळ्या आणि राखाडी रंगाची साडी नेसली आहे. तिने कानात मोठे इअरिंग घातले आहेत. केसांचा अंबाडा घालून केसांमध्ये गजरा माळला आहे. यासोबत तिने कपाळी टिकली लावली आहे. तिने खांद्यावर पदर घेतलेला आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत सोज्वळ आणि सुंदर दिसत आहे. तिच्या बोल्ड लूकप्रमाणे तिच्या या पारंपारिक लूकला देखील तिचे चाहते जोरदार प्रतिसाद देत आहेत. तिचा हा फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

मिथिलाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती मागील काही दिवसात ‘त्रिभंगा’ या चित्रपटात काजोलसोबत स्क्रीन शेअर करत होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला भरभरून दाद मिळाली होती. सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी मिथिला ही एक आहे. मिथिलाने तिच्या करिअरची सुरुवात ‘वरुण नार्वेकर’ यांच्या ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटातून केली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांनी काम केले आहे. यासोबतच तिने २०१४ मध्ये ‘माझा हनिमून’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे. (actress mithila palkar’s traditional photos viral on social media )

तिने २०१८ मध्ये इरफान खानसोबत ‘कारवां’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील दोघांच्या आंबट- गोड केमिस्ट्रीने सगळ्यांना खूप हसवले तसेच भावनिक देखील केले. तसेच तिने ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनाली कुलकर्णीने ‘बैरागी…बैरागी का सूती चोला…ओढ़के चली…’ म्हणत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

-अंतरा मारवाहच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला संपूर्ण कपूर कुटुंबाची हजेरी, कपूर सिस्टर्सने केली धमाल

-नलूच्या शालूमुळे मालिकेची पोलखोल, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेच्या सीनमध्ये झाली मोठी चूक

हे देखील वाचा