Monday, July 1, 2024

‘जस्सी’ म्हणून झाली लोकप्रिय, तर अश्लील एमएमएस लीक झाल्यामुळे मोना सिंग सापडली होती वादात

‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेत आपल्या निरागसतेने सर्वांची मने जिंकणारी मोना सिंग आज (8 ऑक्टोबर) आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. या मालिकेमुळे तिला बरीच लोकप्रियता मिळाली. घरोघरी तिला जस्सी नावाने हाक मारली जायची. पण एक वेळ आली जेव्हा तिचा एमएमएस लीक झाला. त्यानंतर ती खूप वादात सापडली. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.

मोना सिंगचा जन्म 8 ऑक्टोबर 1981 रोजी चंदीगडमधील एका पंजाबी कुटुंबात झाला. ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकतून तिने टीव्हीमध्ये पदार्पण केले. जस्सीच्या पात्रामध्ये चाहत्यांनी तिला भरभरून प्रेम दिले. चष्मा घातलेली ही जस्सी खऱ्या आयुष्यात कशी दिसते, हे जाणून घेण्यासाठी सर्व चाहत्यांना उत्सुकता होती. याच कारणामुळे या शोला खूप टीआरपी मिळाला. जस्सीच्या पात्राशिवाय मोना सिंग ‘क्या हुआ तेरे वादा’, ‘प्यार को हो जाने दो’ आणि ‘कवच-काली शक्ती से’ यासह अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली.

मिशन ओव्हर मार्स (२०१९)
मोना सिंग ‘मिशन ओव्हर मार्स’ वेब सीरिजमध्ये दिसली. मोना मोशमी घोषच्या भूमिकेत दिसली, जी एक विचित्र महिला शास्त्रज्ञ असते आणि मंगळावर ऑर्बिटर पाठवण्यासाठी दिवस -रात्र मेहनत करते.

कहने को हमसफर है (२०१८)
मोना सिंग, रोनित रॉय आणि गुरदीप कोहली या शोमध्ये दिसले. हा शो अल्ट बालाजीवर प्रसारित झाला होता. याचे तीन सीझन प्रदर्शित झाले आहेत आणि चौथ्या सीझनवरही काम सुरू आहे. यामध्ये मोना सिंग एका विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडते.

कवच (२०१६)
या अलौकिक नाटकात तिने परिधी बुंदेलाची भूमिका साकारली, जी तिच्या पतीवर मनापासून प्रेम करत होती. कथेत ट्विस्ट येतो जेव्हा तिची भेट तिच्या पतीच्या एक्स भूतासोबत होती.

प्यार को हो जाने दो (२०१५-२०१६)
‘प्यार को हो जाने दो’मध्ये मोना सिंगने प्रीतची भूमिका साकारली होती. हे एक गुंतागुंतीचे नाटक होते, ज्यात मोनाचे लग्न एका पाकिस्तानी गुप्तहेरशी होते. कमी टीआरपीमुळे ही मालिका बंद करण्यात आली.

क्या हुआ तेरा वादा (२०१२-२०१३)
मोना सिंग या मालिकेत गृहिणीच्या भूमिकेत होती, जी पती आणि तीन मुलांसोबत राहते. मालिकेत मोनाचा नवरा चुकून त्याच्या मैत्रिणीच्या हातून मरण पावतो. नंतर या मालिकेनेही लीप घेतली.

चित्रपटांमध्येही दिसलीय अभिनेत्री
आमिर खानच्या ‘३ इडियट्स’ चित्रपटात करीना कपूरच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत मोना सिंग दिसली होती. यानंतर ती बॉलिवूड चित्रपट ‘ऊटपटांग’, ‘जेड प्लस’ आणि ‘अमावस’मध्येही दिसली. चित्रपटांव्यतिरिक्त मोना सिंग तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे.

खरं तर, २०१३ साली मोना सिंगचा अश्लील एमएमएस खूप व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये मोना सिंग सारखी एक महिला विवस्त्र दिसली. त्या दिवसामध्ये ती या व्हिडिओमुळे चर्चेत होती. त्यानंतर तिने गुन्हे शाखेकडे तक्रारही केली होती.

तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, ती तिच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे. त्यांचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत राहते. मोना सिंगचे डिसेंबर २०१९ मध्ये लग्न झाले. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तिने बॉयफ्रेंड श्यामशी लग्न केले. मोनाला अजूनही जस्सी म्हणून ओळखले जाते, परंतु या व्यतिरिक्त, ती अनेक उत्कृष्ट शोमध्ये देखील दिसली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुष्मितापासून ते शाहिदपर्यंत, ‘हे’ दिग्गज कलाकार ओटीटीवर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज, यादी पाहाच

लग्नानंतर रिचा चड्ढानं घातलं ‘एवढ्या’ लाखांचं मंगळसूत्र; नेटकरी म्हणाले, ‘बुर्खा अन् हिजाब घाल’

हे देखील वाचा