Friday, August 1, 2025
Home भोजपूरी मोनालिसाने ‘साड़ी के फॉल सा’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; सोनाक्षीचाही डान्स वाटेल तिच्यासमोर फिका

मोनालिसाने ‘साड़ी के फॉल सा’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; सोनाक्षीचाही डान्स वाटेल तिच्यासमोर फिका

भोजपुरी इंडस्ट्रीपासून हिंदी टीव्ही मालिकांपर्यंत आपली छाप सोडणारी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी ती नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. आता तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ तिने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

या व्हिडिओत ती ‘आर राजकुमार’ या हिंदी चित्रपटातील ‘साड़ी के फॉल सा’ या गाण्यावर दमदार डान्स करत आहे. तिचा हा डान्स पाहून तुम्हीही तिचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. मोनालिसाने काही दिवसांपूर्वी डान्सचा व्हिडिओ शेअर केला होता, जो आता व्हायरल होत आहे. यात ती अशाप्रकारे ठुमके लावत आहे की, सोनाक्षी सिन्हाचाही डान्स तिच्या समोर फिका वाटेल. (Actress MonaLisa dance to the song Saree Ke Fall Sa)

अभिनेत्री मोनालिसा उर्फ ​​अंतरा बिस्वासने तिचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला असून आतापर्यंत या व्हिडिओला २.५ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज आणि २७ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओला कॅप्शन देत तिने लिहिले की, “सारी प्रेम.”

टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईसारख्या अभिनेत्रीनेही तिच्या या पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मोनालिसाचा डान्स व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये मोनालिसाचे डान्स मूव्हज चाहत्यांना खूप आवडत आहेत.

अभिनेत्री मोनालिसा पती विक्रांत सिंह राजपूतसोबत मालदीवच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. जिथून ती तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो शेअर करत आहे. यामध्ये तिचा सिझलिंग अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे. यामध्ये ती खूप सुंदर आणि बोल्ड दिसत होती. तिच्या हॉट फोटोंनी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत. तिच्या फोटोवर कमेंट्सचा पूर आला आहे. मोनालिसाचे इंस्टाग्रामवर ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

मोनालिसाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने अजय देवगण आणि सुनील शेट्टी समवेत ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अमीन गाझीच्या विरुद्ध ‘तौबा तौबा’ या चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारली. तिने ‘ जॅकपॉट’ नावाच्या कन्नड चित्रपटातही काम केले.

मोनालिसाने अनेक भोजपुरी चित्रपटात काम केले आहेत. त्याचबरोबर हिंदी, बंगाली, ओडिया, तमिळ, कन्नड आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्येही ती दिसली आहे. ती २०१६ मध्ये ‘बिग बॉस १०’ ची स्पर्धक होती. मोनालिसा नाझरमध्ये मोहना राठोडच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. २०२० ते २०२१ मध्ये तिने कलर्स टीव्हीवरील ‘नमक इश्क का’मध्ये इरावती वर्माची भूमिका केली होती. त्याचबरोबर तिने ‘नजर’ आणि ‘नजर 2’ या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. यासोबत तिने ‘सुहाग’, ‘प्रतिज्ञा’, ‘गदर’, ‘अदालत’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या एका प्रश्नासाठी बिग बींनी मागितली माफी; केली होती ‘ही’ चूक

-‘पद्मावत’ फेम सरभ आहे मानसशास्त्राचा पदवीधर; रणवीरला त्याची ‘ही’ गोष्ट आवडल्याने मिळाला चित्रपट

-अरे भारीच ना! ‘ट्रेंडिंग गर्ल’ नीलमचे गाणे रिलीझ होताच व्हायरल; अभिनेत्रीच्या डान्सने प्रेक्षकांना भुरळ

हे देखील वाचा