Tuesday, December 23, 2025
Home भोजपूरी ‘एकदम नशेत’, म्हणत ‘या’ अभिनेत्याने केली मोनालिसा अन् तिच्या पतीच्या व्हिडिओवर कमेंट, तुम्हीही पाहा

‘एकदम नशेत’, म्हणत ‘या’ अभिनेत्याने केली मोनालिसा अन् तिच्या पतीच्या व्हिडिओवर कमेंट, तुम्हीही पाहा

भोजपुरी अभिनेत्री या त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरील पोस्टमुळेही तुफान चर्चेत असतात. यामध्ये अभिनेत्री मोनालिसा हिचाही समावेश होतो. मोनालिसा ही दररोज माध्यमांचे लक्ष वेधून घेत असते. तिने भोजपुरीपासून ते हिंदी टीव्ही मालिकांपर्यंतचा पल्ला गाठला आहे. तिला हिंदी टीव्ही मालिकांमधूनही तुफान प्रसिद्धी मिळाली आहे. ती सध्या पती विक्रांत सिंग राजपूत याच्यासोबत शानदार वेळ घालवत आहे.

पतीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय मोनालिसा
मोनालिसा (Monalisa) हिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशात तिने तिच्या सुट्टीदरम्यानचे काही शानदार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसते की, मोनालिसा तिचा पती विक्रांत सिंग राजपूत (Vikrant Singh Rajpoot) याच्यासोबत दिसत आहे. ते दोघेही स्वीमिंग पूलमध्ये जेवण करत आहेत. याव्यतिरिक्त मोनालिसाच्या दुसऱ्या एका व्हिडिओत ती विक्रांतसोबत फिरायला जाताना दिसत आहे. या फोटोंमधून मोनालिसा आणि तिच्या पतीमध्ये किती जास्त प्रेम आहे, याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikraant Singh (@vikrant8235)

मोनालिसाने तिच्या या व्हिडिओला “आजचा मूड,” असे कॅप्शन दिले आहे. मोनालिसाच्या या व्हिडिओबद्दल बोलायचं झालं, तर तिच्या व्हिडिओला २० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, शेकडो कमेंट्सचाही पाऊस पडला आहे. तिच्या या व्हिडिओवर अभिनेता आदित्य आहुजा याने कमेंट करत लिहिले आहे की, “एकदम नशेत आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “खूप सुंदर जोडपे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

मोनालिसाच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्या ‘बिग बॉस’ (Bigg Boss) या रियॅलिटी शोमधून तुफान प्रसिद्धी मिळाली होती. खरं तर, मोनालिसाने स्पर्धक म्हणून ‘बिग बॉस १०’मध्ये भाग घेतला होता. यामध्ये मोनालिसा, मनू पंजाबी आणि मनवीर गुर्जर या तिकडीची चांगलीच चर्चा झाली होती. इतकेच नाही, तर यादरम्यानच मोनालिसा आणि विक्रांत यांचे लग्न झाले होते. ‘बिग बॉस’ या शोनंतर मोनालिसाने कधीच मागे वळून पाहिले नाही. याच जोरावर मोनालिसाने ‘नजर’ आणि ‘नमक इश्क’ का यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम मिळवत अभिनयाचा जलवा दाखवला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

सुनीता बेबीच्या ठुमक्यांनी दिली सपना चौधरीच्या डान्सला टक्कर, तिच्याच गाण्यावर मिळवले १० लाख हिट्स

‘निसर्गाचेही मूड्स असतात’, पहिल्या पावसाची स्पृहा जोशीची कविता व्हायरल

प्रार्थना बेहेरेच्या घरी नव्या पाहुण्याची एन्ट्री! गोंडस व्हिडिओ शेअर करत नावही सांगितलंय

हे देखील वाचा