Friday, July 5, 2024

शॉकिंग! प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘भावांनी छेडछाड अन् मित्राने तर झोपेतच…’

प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका मोनिगा डोगरा ही आतापर्यंत तिच्या लैंगिकतेबाबत मौन पाळत आली आहे. मात्र, अमेरिकेत जन्मलेल्या मोनिकाने तिच्या एका मुलाखतीत तिच्या लैंगिकतेबाबत मोकळेपणाने चर्चा केली. तिने यावेळी धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले आहे की, ती Pansexual (पॅनसेक्शुअल) आहे. इतकेच नाही, तर तिने यादरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत असे काही खुलासे केले, ज्याने कोणाच्याही अंगावर काटा येईल.

अभिनेत्री मोनिका डोगरा (Monica Dogra) सांगितले की, लहानपणी तिच्या चुलत भावांनी तिचा अनेकदा विनयभंग केला होता. इतकेच नाही, तर एका मित्रानेही तिला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला होता. मोनिकाने सांगितले की, ती एका घाबरलेल्या मुलीप्रमाणे मोठी झाली. मोनिकाने यादरम्यान तिच्या तुटलेल्या लग्नाबाबतही पहिल्यांदाच चर्चा केली.

लहानपणी भावंडांनी केला विनयभंग
मोनिकाने सन २००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘रॉक ऑन’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. तिने किरण राव हिच्या ‘धोबी घाट’ या सिनेमातही काम केले होते. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मोनिका म्हणाली की, “जर तुम्हाला हेदेखील माहिती नसेल की, तुम्ही कोण आहात, तेव्हा स्वत:शी प्रेम करणे कठीण आहे आणि हे शब्द माझ्यासोबत राहतात.” तसं पाहिलं, तर गायिका आणि अभिनेत्री मोनिकाने मागील वर्षीच स्वत:ला पॅनसेक्शुअल सांगितले होते. मोनिकाने २०१६मध्ये सेक्शुअलिटीबाबत एक अभियान चालवले होते. आता तिने बालपणी तिच्यासोबत झालेल्या विनयभंगाबाबत सांगितले आहे.

मोनिकाला यायचे पॅनिक अटॅक
इमरान खान याच्या ‘ब्रेक के बाद’ या सिनेमातील ‘दुरियां’ गाण्याला आवाज देणाऱ्या मोनिकाचे कुटुंब मूळचे जम्मूचे आहे. मोनिका सांगते की, “हे इंटरनेट खूपच विचित्र आहे मी आपल्या जीवनातील सर्वात खोल नैराश्येत होते. मी जवळपास एक वर्षांपर्यंत पॅनिक अटॅकमुळे घरही सोडू शकले नव्हते. त्यानंतर मला असे वाटले की, मी समाज आणि समुदायाचा पाठिंबा मिळवण्याची आशा गमावली आहे.” मोनिका सध्या लॉस एंजेलिस येथे राहते. ती म्हणते की, “मी केवळ पाच किंवा सहा वर्षांपूर्वीच पॅनसेक्शुअल शब्द ऐकला होता. मी विचार केला की, ‘देवा! ही मी आहे.’ हे खूप विचित्र होते. एक तर तुम्ही समलैंगिक असू शकता किंवा स्ट्रेट असू शकता. मी पॅनसेक्शुअल (Pansexual) होते.”

जवळच्या मित्राने चुकीचा स्पर्श केला
तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना मोनिका म्हणाली की, “मी एका वेगळ्या कुटुंबातून आलेली आहे. माझी आई आणि मी आमच्या आयुष्यातील ११ वर्षांहून अधिक काळ वेगळे राहिलो. माझे वडील बहुतेक गप्प असतात. मी मनापासून शेअर केले, तरी ते ऐकत नाहीत. मला वाटते की, कुटुंबात असे बरेच लोक असू शकतात. माझ्याच घरात माझे चुलत भाऊ माझा विनयभंग करायचे. माझा मित्र झोपेत मला चुकीच्या ठिकाणी स्पर्श करायचा. माझ्या कलेतून मी माझे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे.”

पॅनसेक्शुअल म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचे तर, पॅनसेक्शुअल असणे म्हणजे लैंगिकतेशी आहे. ज्याला कोणत्याही विशिष्ट लिंगावर प्रेम करणे किंवा लैंगिक संबंध असणे आवश्यक नसते. त्याला मुलगा, मुलगी, गे, लेस्बियन, स्ट्रेट, किंवा कोणत्याही लिंग किंवा कोणत्याही प्रकारच्या लैंगिकतेच्या प्रेमात पडायला हरकत नसते. त्याच्यासाठी, फक्त व्यक्ती महत्त्वाची असते, त्याची लैंगिकता किंवा लिंग नाही. अभिनेत्री मोनिकाने हा धक्कादायक खुलासा केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

भोले बाबा बनून चिल्लम उडवताना दिसला रितेश पांडे; म्हणाला, ‘नाचे मोर शिव जोगिया’

सलमानने चाहत्यांसोबत ‘हे’ बरं नाही केलं, अनेक वर्षांपासून चालत आलेली प्रथा ‘भाईजान’ने मोडली

आलिया भट्टसोबत कसे वाटते रणबीरने सांगूनच टाकले; काय म्हणाला एकदा वाचाच

हे देखील वाचा