Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

हनिमूनसाठी गेलेली मौनी रॉय पतीसोबत घेते काश्मीरच्या सुंदर खोऱ्यांचा आणि बर्फवृष्टीचा आनंद

टिव्हीवर सुंदर ‘नागिन’ बनून सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मौनी रॉयने अलिकडेच तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर मौनी पती सूरज नांबियारसोबत हनीमूनसाठी काश्मीरच्या खोऱ्यात पोहोचली आहे. मौनी हनिमूनचे अनेक सुंदर फोटो सतत शेअर करत असते. मौनीने पिवळे जॅकेट घातलेले फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

हिमवर्षावाचा घेत आहे आनंद
मौनीने (Mauni Roy) लग्नानंतर इंटरनेटवर वर्चस्व गाजवले आहे. काश्मीरमध्ये हनीमून साजरा करत असलेल्या मौनीने गुलमर्गमध्ये हिमवर्षावाचा आनंद लुटला. सध्या तेथे जोरदार बर्फवृष्टी होत आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात ‘ये हसीन वादियां’ हे गाणे जोडले आहे. हा व्हिडिओ पाहून मौनीला काश्मीर आवडल्याचे स्पष्ट झाले आहे.

बर्फाच्छादित टेकड्यांमध्ये करत आहे ध्यान
व्हिडिओसोबतच मौनीने एका पोस्टद्वारे काही फोटोही शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले आहे की, “पर्वतांच्या शिखरावर ओमिंग करत आहे.” या फोटोंमध्ये मौनी पिवळ्या जॅकेटमध्ये डोळे मिटून ओमचा जप करत आहे. या फोटोंमध्ये तिच्या भांगेत सिंदूरही दिसत आहे.

यापूर्वीही फोटो केले आहेत शेअर
याआधीही अभिनेत्रीने तिच्या हनिमूनचे फोटो तिच्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने तिच्या पतीच्या नावाचा इंग्रजी अर्थ स्पष्ट केला आहे. फोटोंमध्ये मौनी बेज रंगाच्या स्वेटरमध्ये आणि सूरज रंगीबेरंगी स्वेटरमध्ये दिसत आहे. हे कपल सध्या काश्मीरच्या डोंगराळ भागात बर्फाळ वातावरणाचा आनंद घेत आहे.

मौनी रॉय ही एक इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे, तर सूरज हा या सर्वांपासून दूर असलेला इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. सूरजचा जन्म ६ ऑगस्ट रोजी कर्नाटकातील बंगळरू येथील एका जैन कुटुंबात झाला. त्याचे प्रारंभिक शालेय शिक्षण जैन इंटरनॅशनल रेसिडेन्शियल स्कूलमधून झाले. नंतर २००८ मध्ये त्याने बंगळुरूच्या आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग केले. बिझनेसमन असण्यासोबतच सूरज दुबईस्थित इन्व्हेस्टमेंट बँकर देखील आहे. त्याला एक भाऊही आहे. ज्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये सूरज हे सह-संस्थापक आहेत. ही कंपनी पुण्यात आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा