अनेक अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर लहान पडद्यावरून मोठ्या पडद्यावर उडी घेतली आहे. अशा अभिनेत्रींमध्ये मौनी रॉय हिचाही समावेश आहे. तिने आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. ती आपल्या फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. चाहत्यांना तिच्या नवनवीन फोटोंची नेहमीच उत्सुकता लागलेली असते. अशातच आता मौनी रॉय हिने स्विमिंग करतानाचे आपले काही खास फोटो शेअर केले आहेत. यानंतर चाहत्यांनी तिची प्रशंसा केली आहे.
मौनी रॉय हिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील स्विमिंग पूलमधील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.
तिला पांढरा रंग शोभून दिसतो. ती नेहमीच पांंढऱ्या रंगाचे ड्रेस घातलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
मौनी या ड्रेसमध्ये अत्यंत आरामात स्विमिंग करताना दिसत आहे. सोबतच तिचा ड्रेसही तितकाच सुंदर दिसत आहे.
स्विमिंग पूलमध्ये मौनीची ही स्टाईल आणि तिची अदा चाहत्यांच्या पसंतीस येत आहे. तिच्या या फोटोंना ५ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.
मौनीने २००७ साली ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले होते. तिने ‘देवों के देव… महादेव’ आणि ‘नागिन’ या मालिकांमध्येही काम केले आहे. याव्यतिरिक्त तिने २०१८ साली बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार याच्या नायिकेच्या भूमिकेत ‘गोल्ड’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
याव्यतिरिक्त २०१६ मध्ये तिला सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून ‘आयटीए अवॉर्ड फॉर देश की धडकन’ हा पुरस्कार मिळाला होता. सोबतच २०१७ मध्ये सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून ‘गोल्डन पिटल अवॉर्ड्स’ने सन्मानित करण्यात आले होते.
महत्त्त्वाच्या बातम्या-
बंगाली ब्युटी मौनी रॉय अडकणार विवाहबंधनात? पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा
काय सांगता इतकी मोठी चूक! देशातील ‘या’ मोठ्या संस्थेकडून मौनी रॉयचे फोटो चुकून झाले ट्विट
जरा इकडे पाहा! हेमा मालिनीपासून ते मौनी रॉयपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी साकारलीय देवीची भूमिका