टिव्हीवर सुंदर ‘नागिन’ बनून सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मौनी रॉयने अलिकडेच तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधली आहे. मौनी लग्नानंतर सोशल मीडियावर सतत सक्रिय आहे. ती तिचे वेगवेगळे फोटो सतत शेअर करत आहे. ज्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पतीसोबत काश्मीरच्या बर्फाळ प्रदेशाचा आनंद घेत होती. आता हे नवविवाहित जोडपे विमानतळावर दिसले आहे.
खर तर, मौनी (Mauni Roy) आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) त्यांच्या सुखद प्रवासातून परतले आहेत. हे नवविवाहित जोडपे काश्मीरमधील गुलमर्ग भागात ३ ते ४ दिवस राहिले. आता त्यांच्या हनीमूनच्या सुंदर प्रवासाचा आनंद घेतल्यानंतर दोघेही त्यांच्या मूळ गावी मुंबईला आले आहेत. विमानतळावर हे जोडपे स्वॅगसोबत एकत्र येताना दिसले. पांढऱ्या टी-शर्ट, ओपन ब्लॅक लेदर जॅकेट आणि ब्लू जीन्समध्ये सूरज स्मार्ट दिसत आहे. त्याचवेळी, मौनी लाल लाईनिंग असलेल्या काळ्या ट्रॅकसूटमध्ये आश्चर्यकारकपणे स्टायलिश दिसत आहे. काळ्या गॉगल आणि मोकळ्या केसांनी तिने तिचा लूक पूर्ण केला.
इतकेच नाही, तर अभिनेत्रीने तिच्या हातात लाल बांगड्या घातल्या आहेत, ज्याची झलक तिच्या स्लीव्हमधून दिसते. विमानतळावर दोघांनीही पॅपराझींना भरपूर पोझ दिल्या. सोशल मीडियावर त्यांच्या फोटो आणि व्हिडिओंचा बोलबाला आहे. हे जोडपे खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. २७ जानेवारी रोजी गोव्यातील एका भव्य समारंभात मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी एकमेकांना आयुष्याचे जीवनसाथी म्हणून निवडले. या जोडप्याने दक्षिण भारतीय आणि बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न केले. दुसरीकडे, हळदी आणि मेहंदीची फंक्शन्स २६ जानेवारीपासूनच सुरू झाले होते.
मौनी रॉय ही एक इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे, तर सूरज हा या सर्वांपासून दूर असलेला इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. सूरजने २००८ मध्ये बंगळुरूच्या आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग केले. बिझनेसमन असण्यासोबतच सूरज दुबईस्थित इन्व्हेस्टमेंट बँकर देखील आहे. त्याला एक भाऊही आहे. ज्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये सूरज सह-संस्थापक आहे. ही कंपनी पुण्यात आहे.
हेही वाचा –
- साऊथच्या ‘या’ कलाकारांची देवासारखी केली जात होती पूजा, पण कधीच बॉलिवूडकडे नाही वळले
- उर्फी जावेदने परिधान केला विचित्र कटआउट ड्रेस, युजर म्हणाले ‘खिडकीचा पडदा लावून आली’
- शहनाझ गिल समुद्र किनाऱ्यावर दिसली मस्ती करताना, बऱ्याच दिवसांनी अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर दिसले हसू