Wednesday, July 3, 2024

मृणाल ठाकूर नवीन प्रोजेक्टसाठी झाली सज्ज; आदित्य रॉय कपूरसोबत ‘या’ आगामी चित्रपटात झळकणार अभिनेत्री

टेलिव्हिजनमधून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या यशाच्या शिखरावर आहे. मृणाल ठाकूर ही सध्या यादीतील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या आणखी एका आगामी प्रकल्पाची घोषणा केली आहे. मृणाल ठाकूर लवकरच भूषण कुमार आणि मुराद खेतानी यांच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांना भेटण्यास येणार आहे. ज्याची घोषणा स्वतः मृणालने सोशल मीडियाद्वारे केली आहे.

खरं तर मृणाल ठाकूर लवकरच ‘थडम’ या दक्षिण भारतीय चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. मृणाल या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटासाठी आदित्य रॉय कपूरचे नाव आधीच निश्चित झाले होते. त्यानंतर तो अनेक दिवसांपासून चित्रपटासाठी अभिनेत्री शोधत होता. आता मृणाल ठाकूरपर्यंत येऊन निर्मात्यांचा शोध थांबला आहे आणि त्यांनी या चित्रपटासाठी मृणालच्या नावावर शिक्का मारला आहे. (Actress Mrinal Thakur is ready for a new project, announced by tweet)

मृणाल ठाकूरने स्वतः तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून याची घोषणा केली आहे. तिने आदित्य रॉय कपूरसोबतचा एक फोटो देखील शेअर केला. या फोटोसह, तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “स्पर्धेची वेळ आली आहे! आदित्य तू तयार आहेस का? थडमच्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे.” शिवाय वर्धन केतकर ‘थडम’च्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन करणार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाचे निर्माता भूषण कुमार आणि मुराद खेतान आहेत.

मृणाल ठाकूरने आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनद्वारे केली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये ‘बटला हाऊस’ हा चित्रपट केला. या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत अभिनेत्री दिसली होती. यानंतर मृणाल ‘सुपर ३०’ चित्रपटात ऋतिक रोशनसोबत दिसली. अलीकडेच फरहान अख्तरच्या ‘तुफान’ या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले आहे. आता या आगामी चित्रपटात ती कशी भूमिका साकारणार हे पाहण्यासारखे आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारसोबत केले होते पदार्पण; मात्र सुंदरतेने वेड लावलेली शांतीप्रिया आज का राहतेय बॉलिवूडपासून दूर?

-सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा