स्टार प्रवाहवर काही दिवसांपूर्वीच सुरु झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) मालिका चांगलीच चर्चेत आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी प्रेक्षाकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशातच या कलाकारांमधील एक अशी अभिनेत्री जी तिच्या घरगुती व्यवसायाचमुळं चर्चेत आली आहे.
हिंदी असो वा मराठी अनेक कलाकार अभिनयासोबत अनेक व्यवसाय करताना दिसतात. त्यापैंकीच एक अभिनेत्री म्हणजे मृणाली शिर्के(Mrunali Shirke). प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मृणाली शिर्के ही मुख्य भूमिका साकारलेल्या मुक्ताची म्हणजे तेजश्री प्रधानची बहीणीच्या भूमिकेत दिसत आहे. मृणाली (Mrunali Shirke)ही अभिनयासोबतच घरगुती व्यवसायदेखील सांभाळत आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी मृणालीने (Mrunali Shirke)आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती केक बनवताना दिसत आहे. तिच्या या पोस्टवरुन तिचा बेकरीचा व्यवसाय असल्याचे समजले. Mru’s Bakery & Confections असं तिच्या बेकरी व्यवसायाच नाव आहे. मृणाली स्वतः घरात विविध प्रकारचे केक बनवून विकते. तिच्या या व्यवसायाचं इंस्टा पेज पाहता कप केकसह विविध प्रकारचे केक पाहायला मिळतात.
View this post on Instagram
View this post on Instagram
मृणालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास,. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेमध्ये सध्या ती दिसत आहे. तर यापूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये मृणालीनं काम केलं आहे. ‘मेरे साई’, ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकांमध्ये मृणालीने काम केलं आहे. तसेच ती ‘हरिओम’ या चित्रपटातदेखील झळकली होती.