Friday, July 5, 2024

‘माझा होशील ना’ फेम अभिनेत्रीला ‘या’ कारणामुळे नाकारला मंदिरात प्रवेश, व्हिडिओ शेअर करून व्यक्त केले दुःख

टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यातील सगळ्यांची आवडती मालिका ‘माझा होशील ना!’ या मालिकेने एका वर्षातच हाहा म्हणता यशाचे शिखर गाठले. मालिकेचे कहाणी काहीशा वेगळ्या आशयावर आधारित असल्याने प्रेक्षकांनी देखील मालिकेला जबरदस्त प्रतिसाद दिला. झी मराठी पुरस्कार सोहळ्यात देखील या मालिकेला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. यावरूनच या मालिकेची लोकप्रियता लक्षात येते.

मालिकेतून सगळीच मात्र अत्यंत उत्कृष्ट होती. गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. त्यांच्या प्रेमाच्या सुरुवातीपासून आणखी एक व्यक्ती त्यांच्यासोबत होती ती नयना म्हणजेच सगळ्यांची आवडती अभिनेत्री मुग्धा पुराणिक. तिने या मालिकेत सईच्या मैत्रिणीचे पात्र निभावले होते. मालिकेतील तिचे नटखट, चंचल आणि विनोदी पात्र सगळ्यांना खूप आवडले. अशातच अभिनेत्रीबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. (Actress mugdha puranik stoped at famour manas temple in kalyan because she is not jain)

मुग्धाला एका मंदिरात प्रवेश नाकारला आहे. ती कल्याण परिसरातील प्रसिद्ध मानस या जैन मंदिरात गेली होती. यावेळी तिला आणि तिच्या मैत्रिणींनी तेथील लोकांनी ओढणी दिली. पण काही वेळाने त्यांना ते जैन धर्माचे नसल्याचं कारण देत मंदिरात प्रवेश नाकारला गेला. यावेळी मुग्धाने व्हिडिओ पोस्ट करत ही बाब चाहत्यांशी शेअर केली आहे.

मुग्धाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर एक आहे. या व्हिडिओ मध्ये ती म्हणते की, “हा अनुभव माझ्यासाठी खूपच वाईट होता. मंदिरात गेल्यावर सुरुवातीला आम्हाला ओढणी देण्यात आली, ती आम्ही घेऊन रांगेत उभे राहिलो होतो; परंतु आम्ही जैन धर्मीय नसल्याने आम्हाला दर्शन घेण्यास मनाई केली गेली. आता यावर कोणीतरी काही तरी कारवाई केली पाहिजे.”

तिच्या या व्हिडिओ वर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. मुग्धा ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहचली आहे. सोशल मीडियावर देखील तिची खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘असे’ केल्यास प्रियांका चोप्राला बसू शकतो पती निकचा मार, स्वतः केला खुलासा

-नोरा फतेहीचे ‘कुसु कुसु’ गाणे प्रदर्शित, डान्स मूव्ह्जने चुकवला रसिकांच्या काळजाचा ठोका

-बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पूर्ण केलेल्या रणबीर कपूरने नाकारले होते ‘हे’ सहा सुपरहिट सिनेमे

हे देखील वाचा