Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘बबिताजीं’चे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; फोटो पाहून जेठालाल तर सोडाच, तुम्हीही व्हाल फिदा

फिटनेसच्या बाबतीत प्रत्येकजण प्रचंड जागरूक असतो. अनेकजण आपले वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगा करतात. जेणेकरून त्यांना लठ्ठपणा सारख्या समस्येला सामोरे जावे लागू नये. हे केवळ सर्वसामान्य व्यक्तींच्या आयुष्यातच नाही, तर अनेक कलाकारांच्या बाबतीतही घडत आहे. मनोरंजन विश्वात अनेक कलाकार वजनामुळे खूप चिंतेत आहेत. प्रत्येकजण फिट दिसण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत कलाकार अनेकदा जिममध्ये घाम गाळताना दिसतात. काही इंटरमिटन फास्टिंग करतात, तर काही घरच्या घरी वजन कमी करतात. मनोरंजन जगतातील अनेक कलाकारांनी अलीकडच्या काळात सोशल मीडियावर ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहेत, ज्याने इतरांनाही प्रेरणा दिली आहे. यामध्ये आता ‘बबिता जी’ म्हणजेच मुनमुन दत्ताचाही समावेश झाला आहे.

मुनमुन दत्ताने सांगितला वजन कमी करतानाचा प्रवास
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमधील प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ताचे वजन आधीही खूप चांगले होते, पण चार महिन्यांत मेहनत करून तिने वजन आणखी कमी केले आहे. यासोबतच तिने तिचा पूर्वीचा आणि आताचा फोटोही शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडत आहे.

मुनमुनने दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत तिचे थोडे जास्त वजन असल्याचे दिसत आहे आणि दुसऱ्या फोटोत ती पूर्वीपेक्षा खूपच फिट दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. पहिल्या फोटोत मुनमुन सूटमध्ये दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत ती जिमच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. तिच्या या पोस्टला आतापर्यंत ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

फोटो शेअर करत मुनमुनने लिहिले की, “नियमित वर्कआऊटसोबत खास डाएटचा समावेश केला आणि शरीरात होणारे बदल जाणवले. चांगली गोष्ट म्हणजे चार महिने वर्कआउट न केल्यानंतर मी पुन्हा सतत वर्कआऊट करायला सुरुवात केली.”

तिने पुढे लिहिले की, “बदल पाहून आणि जाणवत असताना, मी माझ्या व्यस्त वेळापत्रकातून शक्य वर्कआऊट करण्यासाठी परत आले आहे. परिपूर्ण बॉडी मिळविण्यासाठी खूप लांब जाणे कठीण आहे, परंतु मी ट्रॅकवर आहे आणि प्रेरित आहे. हा एक प्रवास असेल आणि मी देखील उत्सुक आहे.”

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी मालिका आहे. ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील साधी आणि मजेदार कथा चाहत्यांना आवडते. विशेष म्हणजे, या कथेत दिसणारे पात्रही आपल्या दमदार अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. या मालिकेत अभिनेत्री मुनमुन दत्ता ‘बबिता जी’च्या भूमिकेत दिसली असून, ती सर्वांची लाडकी आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ ‘जय भीम’च नाही, तर ‘हे’ चित्रपट देखील आहेत सत्य घटनांवर आधारित, टाका एक नजर

-कर्नाटक वन विभागातील हत्तीच्या पिल्लाला देण्यात आले सुपरस्टार पुनीत राजकुमारचे नाव, सदैव राहणार आठवणीत

-वडिलांची परवानगी मिळाली असती, तर सलमान असता जुहीचा पती; लग्नासाठी हात मागायलाही गेला होता, पण…

हे देखील वाचा