Monday, July 1, 2024

लेडी सुपरस्टार नयनताराने केला तिच्या जुळ्या मुलांच्या नावांचा खुलासा, तर नवऱ्याने शेअर केले फोटो

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील लादी सुपरस्टार नयनताराने ९ जून २०२२ रोजी निर्माता आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवनसोबत लग्न केले. लग्नाच्या चार महिन्यानंतर लगेच त्यांनी ते सरोगसीचा माध्यमातून जुळ्या मुलांचे आईबाबा झाल्याचे जाहीर केले. त्यांच्या या खुलाशामुळे एकच वाद निर्माण झाला. तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागले. मात्र नयनतारा आणि विग्नेश या दोघांनी देखील याकडे लक्ष दिले नाही. आता मात्र या दोघांनी त्यांच्या मुलांची नावे जाहीर केली आहेत.

नयनताराला दोन जुळे मुलं आहेत. नुकतेच ती चेन्नईमधील एका कार्यक्रमात पाहुणी म्हणून पोहचली होती. या कार्यक्रमातील तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ तिच्या एका फॅन पेजवरून शेअर करण्यात आला असून, यामध्ये ती तिच्या मुलांच्या नावाचा खुलासा करताना दिसत आहे. यातच तिने तिच्या मुलांचे नाव उयिर रुद्रोनिल एन शिवन आणि दुसऱ्या मुलाचे नाव उलग ढैवाग एन शिवन असे असल्याचे सांगितले आहे. नयनताराने एकीकडे तिच्या मुलांच्या नावांचा खुलासा केला तर दुसरीकडे तिचा नवरा असलेल्या विग्नेश शिवनने त्यांच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो कमालीचे व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांच्या पसंतीच्या कमेंट्स येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vignesh Shivan (@wikkiofficial)

आई झाल्यानंतर नयनतारा कामातून ब्रेक घेणार असल्याचे सांगितले जात असले तरी ती लवकरच शाहरुख खानसोबत ‘जवान’ सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा येत्या २ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान नयनतारा जरी साऊथमधील लेडी सुपरस्टार असली तरी तिची फॅन फॉलोविंग संपूर्ण जगात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जाहिरातींमधून अभिनय काराकिर्दीची केली सुरुवात; आज आहेत बाॅलिवूडचे प्रसिद्ध स्टार्स, एकदा पाहाच यादी

रवी किशन यांच्या सिनेसृष्टीतील अंमली पदार्थांवरील ‘त्या’ वक्तव्यावरून जया बच्चन यांनी त्यांना सुनावले होते खडेबोल

हे देखील वाचा