Monday, July 1, 2024

नीना गुप्ता यांनी ट्रोल करणाऱ्यांना दिली कडक चेतावणी; म्हणाल्या, ‘…जज करणे थांबवा’

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्यासोबतच सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी आहेत. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांचेही नाव आहे. त्यांच्या कामगिरीवरून त्या अत्यंत बिनधास्तपणे सर्वांसमोर आपला मुद्दा ठेवण्यासाठी ओळखल्या जातात. वयाच्या ६२ व्या वर्षी देखील नीना खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसतात. त्या सतत सोशल मीडियावर चाहत्यांशी सवांद साधत असतात. अनेकदा महिलांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या नीना यांनी नुकताच स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नीना यांनी लहान कपड्यांमुळे किंवा ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोल करणाऱ्या महिलांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

सेक्सी ड्रेसमध्ये बसलेल्या दिसल्या नीना
नीना यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. पण आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने त्यांनी बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान मिळवले आहे. नीना यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर कपड्यांवरून जज करणाऱ्या महिलांची चांगलीच शाळा घेतली आहे. या व्हिडिओमध्ये नीना म्हणत आहेत की, “ही पोस्ट करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. कारण काही लोक सेक्सी टाईपचे ड्रेस घालतात, जसे मी परिधान केले आहेत. या लोकांचा ड्रेस पाहून समाजातील काही चांगल्या लोकांना वाटतं की, हे निरुपयोगी लोक आहेत. त्यांना काहीच येत नाही.”

नीना संस्कृतमध्ये आहेत एमफिल
नीना यांनी आपले म्हणणे पुढे चालू ठेवले आणि म्हणाल्या की, “ज्यांना वाटते की, मी संस्कृतमध्ये एमफिल केले आहे आणि बरेच काही केले आहे. त्यांना मी सांगू इच्छिते की, ट्रोल करणार्‍यांनो समजून घ्या की, कपड्यांवरून लोकांना जज करू शकत नाही.”

चाहत्यांचे लक्ष घेतले वेधून
नीना यांचा हा व्हिडिओ थक्क करणारा आहे. त्यांच्या या व्हिडिओमुळे अनेक चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आणि म्हटले की “योग्य गोष्ट पूर्णपणे बोलली आहे.” एका युजरने लिहिले की, “कधीही कोणालाही कपड्यांवरून जज करू नका.” दुसर्‍याने लिहिले की, “नीना जी, तुम्ही प्रत्येक ड्रेसमध्ये छान दिसता.” तर आणखी एकाने लिहिले की, “तुम्ही किती जबरदस्त गोष्ट बोललीत.”

खूपच स्टायलिश आहेत नीना
बॉलिवूडमधील सर्वात जुन्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या नीना यांच्यामध्ये जुने असे काही नाही. त्या त्यांच्या ड्रेसिंग सेन्सची खूप काळजी घेतात आणि काळाच्या खांद्याला खांदा लावून चालतात. नीना शेवटचा पडद्यावर ‘८३’ चित्रपटात दिसल्या होत्या. ज्यामध्ये त्यांनी रणवीरच्या आईची भूमिका साकारली होती.

हेही वाचा

हे देखील वाचा