Friday, July 5, 2024

आलिया भट्ट लवकरच होणार कपूर घराण्याची सून?? नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या फॅमिली फोटोवर रंगल्या चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर या नेहमीच त्यांच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. त्या प्रेक्षकांना इंप्रेस करण्याची एकही संधी सोडत नाही. म्हणूनच आज त्या त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर या भलेही एकट्या पडल्या असतील. पण त्यांचे कुटुंब नेहमीच त्यांच्या सोबत उभे आहे. नुकतेच नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर त्यांच्या परिवार सोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नीतू कपूर यांनी त्यांचा मुलगा आणि मुलीसोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यातील खास गोष्ट म्हणजे या फोटोत आलिया भट्ट देखील दिसत आहे. याचा अर्थ नीतू यांनी आता आलिया भट्टला त्यांच्या कुटुंबात स्थान दिले आहे. त्या आता तिला त्यांच्या कुटुंबाचा भाग असल्याप्रमाणे वागवत आहेत.

नीतू कपूर यांनी हा फोटो त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “माझे जग.” याआधी देखील त्यांनी आलिया सोबतचे फोटो शेअर केले होते. परंतु त्याच्या कॅप्शनमुळे फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

नीतू कपूर यांनी हा फॅमिली फोटो शेअर केल्यानंतर आता त्यांचे चाहते असा अंदाज लावत आहेत की, नीतू कपूर या लवकरच आलिया भट्टला त्यांची सून बनवून घेणार आहे का?? तसेच रणबीर कपूरने देखील एका मुलाखतीत सांगितले होते की, कोरोनामुळे त्यांचे लग्न थांबले आहे. त्यामुळे आता असा अंदाज लावला जात आहे की, कदाचित रणबीर आणि आलियाचे लग्न याच वर्षी होणार आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अनेक वर्षापासून रिलेशनमध्ये आहेत. त्यांनी या गोष्टीचा खुलासा सर्वांसमोर केला आहे. जेव्हा ऋषी कपूर आजारी होते, तेव्हा आलिया रणबीर सोबत त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये जात होती. ऋषी कपूर यांच्या मृत्यूनंतरही आलिया कपूर कुटुंबासोबत स्पॉट झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंटरनेटवर धमाल करतेय ‘ही’ दयाबेन; व्हिडिओ पाहून चक्रावले सोशल मीडिया युजर्स

-ऐश्वर्याशी झालेल्या ब्रेकअपनंतर विवेकने एका मंत्र्याच्या मुलीसोबत थाटला संसार; आज जगतोय सुखी आयुष्य

-चिमुकल्या ‘आनंदी’ची निरागसता पाहून प्रेक्षकांचे हरपले भान; ‘बालिका वधू २’चा प्रोमो झाला रिलीझ

हे देखील वाचा