Saturday, June 29, 2024

नीतू कपूर यांनी केला ऋषी कपूर यांच्यासोबतचा न्यूयॉर्कचा व्हिडिओ शेअर, एकदा तुम्हीही घ्या पाहून

सन २०२० हे वर्ष सर्वांसाठीच त्रासदायक होते. यादरम्यान अनेक दिग्गज कलाकारांना आपला जीव गमवावा लागला होता. या जगाचा निरोप घेणाऱ्या कलाकारांमधीलच एक म्हणजे अभिनेता ऋषी कपूर होय. त्यांचे निधन होऊन आता ११ महिने उलटले आहेत. तरीही, त्यांच्या कुटुंबासोबतच चाहत्यांच्या आठवणीतही ते कायम आहेत. अशामध्ये त्यांच्या पत्नी नीतू कपूर आणि मुलगी रिद्धिमा साहनी यांनी सोशल मीडियावर ऋषी कपूर यांच्याशी निगडीत काही पोस्ट शेअर केल्या आहेत.

नीतू कपूर यांची पोस्ट
नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर आपला एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत नीतू कपूर यांच्यासोबत दिवंगत अभिनेता आणि त्यांचे पती ऋषी कपूरही दिसत आहेत. हा व्हिडिओ दोघांच्याही शेवटच्या न्यूयॉर्क ट्रिपचा आहे. यामध्ये न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर ऋषी आपल्या अंदाजात मजा करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करत नीतू कपूर यांनी लिहिले की, “आज ऋषी जी यांच्या ११व्या महिन्याची प्रार्थना भेट आहे. त्यामुळे म्हटलं की, आमच्या शेवटच्या न्यूयॉर्क ट्रिपच्या आठवणी शेअर करू.”

रिद्धिमाने काढली वडिलांची आठवण
नीतू कपूर यांनी एकीकडे पती ऋषी कपूर यांच्यासोबतचा कधीही न पाहिलेला व्हिडिओ शेअर केला. दुसरीकडे मुलगी रिद्धिमानेही कुटुंबाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ऋषी कपूर, रणबीर कपूर, नीतू कपूर, रिद्धिमा आणि तिची मुलगी दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CM1I5-EsW2g/?utm_source=ig_web_copy_link

हा फोटो शेअर करत रिद्धिमाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुमचे प्रेम आमच्या मार्गावर प्रकाश पाडेल. तुमची आठवण नेहमी आमच्यासोबत राहील. नेहमी आमच्या अंत: करणात.”

चाहत्यांकडून फोटो आणि व्हिडिओला पसंती
खरं तर चाहत्यांकडूनही ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या व्हिडिओसोबतच रिद्धिमाच्या फोटोलाही पसंती मिळत आहे. पाहता पाहता हा फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-माणुसकीचे उत्तम उदाहरण! मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने दिले घुबडाला जीवनदान; सर्वत्र होतंय कौतुक

-हॉटेल रूममध्ये एकटीच असलेली सनी लिओनी अचानक मारू लागली बेडवर उड्या; चाहत्यांकडून व्हिडिओला मिळतंय भरभरून प्रेम

-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर

हे देखील वाचा