बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया ही दुसऱ्यांना आई बनणार आहे. मागील काही दिवसांपूर्वीच नेहाचे बेबी शॉवर करण्यात आले. त्यादरम्यानचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्याचबरोबर सध्या नेहाने आणखी फोटो पोस्ट केले आहेत. नेहा सध्या गर्भधारणेच्या या क्षणाचा खूप आनंद घेत आहे. नेहा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने पूल पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत.
हे फोटो शेअर करत नेहाने लिहिले की, “दोघांसाठी पूल ️पार्टी.” या फोटोंमध्ये नेहाने काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केलेली दिसत आहे. ती काळ्या रंगात आणि खुल्या केसांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक दिसत आहे. नेहा खूप आनंदी आणि उत्साहित आहे. तिचे फोटो पाहून हे स्पष्ट होते की, तिने या पूल पार्टीचा पुरेपूर आनंद घेतला आहे.
नेहा याआधी एका मुलीची आई आहे. नेहाने पहिल्या मुलीचे नाव ‘मेहेर’ असे ठेवले आहे. परंतु नेहाने अजूनही आपल्या पहिल्या मुलीचा चेहरा दाखवला नाही.
नेहाच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले, तर तिने अंगद बेदीशी लग्न केले आहे. नेहा आणि अंगदने गुपचूप लग्न केले होते. त्यांच्या लग्नाची बातमी समोर येताच सर्वच चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील खूप व्हायरल झाले होते.
लग्नानंतर काही दिवसातच, नेहाने बेबी बंपचे फोटो देखील शेअर केले होते. एका मुलाखतीत नेहा म्हणाली होती की, “ती लग्नाच्या वेळी गर्भवती होती.” अंगद आणि नेहाची जोडी चाहत्यांना खूप आवडते.
नेहा धुपियाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘रोडिज’ या रियॅलिटी शोचे परीक्षण करते. याशिवाय, तिने ‘चुप चुप के’, ‘ज्युली’, ‘कयामत’, ‘दे दना दन’, ‘तुम्हारी सुलू’, ‘सिंग इज किंग’ आणि ‘ऍक्शन रिप्ले’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उर्मिला मातोंडकरने सांगितला गणेश उत्सवाचा अनुभव; म्हणाली, ‘आम्ही कोकणातील आमच्या घरी…’
-‘दिसला गं बाई दिसला’, म्हणणाऱ्या ‘राजा राणीची गं जोडी’ फेम संजूचा गावरान अवतार भावला नेटकऱ्यांना