Wednesday, July 3, 2024

तब्बल 10 वर्षानंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी हलणार पाळणा, खंत व्यक्त करत म्हणाली…

मनोरंज विश्वामध्ये कोरोनाकाळापूसन अनेक सेलिब्रिटी आपल्या नात्याला लग्न बंधानात अडकवत आहेत तर काहींना आई-बाबा बणन्याचं सुख लाभलं आहे. अशातच टीव्ही क्षेत्रामधील प्रसिद्ध मालिका ‘डोली अरमानों की’ फेम नेहा मर्दा हिने नुकतंच चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. लग्नाच्या तब्बल 10 वर्षानंतर अभिनेत्रीच्या घरात पाळना हलनार आहे. त्यामुळे नेहा आणि तिचे कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

‘डोली अरमानों की फेम’ उर्मी म्हणून घराघरात पोहोचणारी प्रसिद्ध अभिनेत्री नेहा मर्दा (Neha Marda) हिने आपल्या दमदार अभिनयाने टीव्ही क्षेत्रामध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले होते, मात्र, तिला खरी ओळख डोली अरमानों की, मधूनच मिळाली. नुकतंच अभिनेत्रीने गोड बातमी दिली. तब्बल 10 वर्षानंतर अभिनेत्री पहिल्यांदा आई होणार आहे.

नेहाने 2012 साली पाटणा व्यावसायिक आयुष्मान अग्रवाल (Ayushman Agarwal) याच्याशी विवाह केला. लग्नांनतर तिला मुल न झाल्यामुळे तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, “जेव्हा मला माझ्या प्रेग्नेंसीबद्दल समजले तेव्हा माझा आनंद गनात मावेनासा झाला होता, मी खुपच उत्साहीत होते. मला लग्न झाल्यावर लगेच आई व्हायचं होतं हे मी नेहमी सांगायचे मात्र, तसं झालं नाही. आता मी तब्बल 10 वर्षानंतर आई होणार आहेत तर मला पहिली मुलीचीच अपेक्षा करताना खूपच आनंद होत आहे.”

 

View this post on Instagram

 

नेहा पुढे म्हणाली की, “आम्ही 10 वर्षापासून प्रयत्न करत होतो, पण मला दिवस जात नव्हते त्यामुळे मला लग्नानंतर मुलं नकोत, मी खूप महत्वकांक्षी आहे, मी गरोदर असे नातेवाइकांनी टोमणेही मारले होते.” नेहाच्या मते ती गरोदर नसल्याने तिला आजूबूजबचे लोक जज कारायचे. नेहा म्हणाली की, “आपल्याला माहित असते की, दूरचे लोक आपल्याबद्दल कराय विचार करतात. मात्र, तुमचं कुटुंब असा विचार करत नाहीत कारण ते तुम्हाला ओळखत असतात. त्यामध्येच अजूबाजूचे लोकही ढवळाढवळ करत असतात. मी त्यांची कधीच पर्वा केली नाही आणि जे काही होईल ते बघीतलं जाईल या विचाराने त्यांच्याकडे पाहूण हसले.”

 

View this post on Instagram

 

नेहने आपल्या करिअरची सुरुवात 2005 साली ‘साथ निभाना साथिया’ या लोकप्रिय मालिकेतून केली होती. त्यानंतर तिने ‘घर एक सपना’ (2005), ‘ममता’ (2006), ‘बालिका वधू’ (2008), ‘जो इश्क की मरझी वो रब की मरझी’ (2009) , ‘देव के देव: महादेव’ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारतीय नारी राॅकींग इन साडी! श्रेया घोषालचा लेटेस्ट लूक एकदा पाहाच
‘ब्युटी विद टॅलेंट’, म्हणून प्रसिद्ध असलेल्या आर्याने शेअर केला हम्पी सफर

हे देखील वाचा