Friday, April 25, 2025
Home अन्य ‘तू कपडे तरी कशाला घालते?’, बोल्ड लूकमुळे निया शर्मा पुन्हा आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

‘तू कपडे तरी कशाला घालते?’, बोल्ड लूकमुळे निया शर्मा पुन्हा आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

आपल्या मादक आणि दिलखेचक अदांनी निया शर्मा कायमच चर्चेत असते. तिच्या बोल्ड आणि हॉट लुकवर तिचे अनेक चाहते फिदा आहेत. अशात आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नवनवीन लूकमुळे तिच्यावर कधी कौतुकाचा वर्षाव होतो, तर कधी तिला टीकेचाही सामना करावा लागतो. नुकतेच तिने काही हटके आणि मादक अंदाजामधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने चंदेरी रंगाचा बॅकलेस आणि शॉर्ट ड्रेस घातला आहे. यावर तिने स्मोकी आय मेकअप केला आहे. तसेच केसांचा बन बांधून कानात एक क्रॉस घातला आहे. या फोटोमध्ये ती खूपच मादक दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर हार्ट इमोजीचा भारीच वर्षाव केला आहे. तसेच काहींनी तिला ट्रोल देखील केले आहे. (Actress Neha Sharma hot look viral on social media)

https://www.instagram.com/p/CUzDznnI6Bw/?utm_source=ig_web_copy_link

नेहमीच हटके लूकसह निया हटके कॅप्शनमुळे देखील चर्चेत असते. तिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आजचा चांगला विचार, उद्याचं मला माहित नाही.” तिच्या या कॅप्शनने देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे.

नियाच्या हा फोटोवर अभिनेत्री निशा रावलने देखील कमेंट केली आहे. तिने कमेंट्मध्ये हार्ट ईमोजी पाठवत असे लिहिले आहे की, “मला असं म्हणायचं आहे…तू एवढी सुंदर कशी काय.” यावर उत्तर देत निया म्हणते की, “मेकअपमुळे”

नियाच्या या फोटोंवर काहींनी तिला ट्रोल देखील केले आहे. एकाने तिला कमेंटमध्ये चांगलेच खडेबोल सुनावत लिहिले आहे की, “तू कपडे तरी कशाला घालते. तुझ्यामुळे ज्या नीट आहेत, त्या पण विचार करत असतील. आम्ही काय तरी चुकीचं तर नाही नाही ना घातलं.” नियाला फॅशनची खूप आवड आहे. तिच्या या लूकमुळे तिने हे सिद्ध केले की, तिला फॅशन करायला किती आवडते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हिना खानचा ब्रेकअप? अभिनेत्रीच्या लेटेस्ट पोस्टमुळे चाहते पडले चिंतेत

-आर्यन खानला सकाळी ७ वाजता मिळणार जेलमधील जेवण, ‘या’ गोष्टीसाठी तरसणार शाहरुखचा मुलगा

-‘हे नक्की शाल्विताच का?’ ओम अन् स्वीटूच्या ‘त्या’ व्हिडिओवर रंगल्यात चाहत्यांच्या चर्चा

हे देखील वाचा