हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. मात्र, याव्यतिरिक्त त्यांनी आपले सौंदर्य आणि बोल्डनेसनेही अक्षरश: चाहत्यांना घायाळ केले आहे. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे नेहा शर्मा होय. मोजक्याच चित्रपटात झळकलेली नेहा सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते. ती आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिचे काही बोल्ड फोटो समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
सुपरस्टार अजय देवगणच्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ चित्रपटात झळकलेल्या नेहाने आपल्या या फोटोंनी सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे. तिने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने पावडर ब्लू रंगाची ब्रा घातली आहे. तसेच निळ्या रंगाचा शर्ट आणि डेनीम जीन्सही परिधान केली आहे. नेहा शर्माने या फोटोमध्ये केस मोकळे सोडले आहे आणि लाइट मेकअपने लूक कव्हर केला आहे. ती भन्नाट पोझ देताना दिसत आहे. (Actress Neha Sharma New Bold Look In Blue Bra See Pics)
चाहत्यांना तिच्या या फोटोंवरून नजर हटवणेही कठीण झाले आहे. तिच्या या फोटोंना आतापर्यंत ५ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. या फोटोवर चाहत्यांनी ३ हजारांपेक्षाही अधिक कमेंट्स केल्या आहेत. कुणी तिला ‘हॉट’, तर कुणी ‘सेक्सी’ म्हणत आहेत. तसेच ‘स्टनिंग’ आणि ‘ब्युटीफुल’ अशा कमेंट्सही चाहत्यांनी केल्या आहेत.
नेहा शर्माच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने २००७ मध्ये ‘चिरुथा’ चित्रपटातून कारकिर्दीला सुरुवात केली होती. यानंतर तिने ‘तुम बिन’, ‘सोलो’, ‘क्रूक’, ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’, ‘यमला पगला दीवाना २’, ‘तेरी मेरी कहानी’, ‘यंगिस्तान’ यांसारख्या अनेक बॉलिवूड आणि टॉलीवूड चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनेते अनुपम खेर यांनी हिंदू धर्माबद्दल केले मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘हिंदू असणे हे जीवन…’
-मोठी घडामोड! एकीकडे जामीन अर्जावर सुनावणी सुरु असतानाच आर्यन खानची आर्थर रोड कारागृहात रवानगी
-आर्यनचे वकील मानेशिंदेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले, आर्यनला ‘ग्लॅमरचा तडका’ लावण्यासाठी…