Monday, July 1, 2024

‘लाज वाटू दे ताई’, निया शर्माच्या बोल्ड डान्स व्हिडिओवर युजर्सची प्रतिक्रिया

‘जमाई राजा 2.0’ या वेब सीरिजमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री निया शर्माला कोणत्याही परिचयाची गरज नाही. टीव्हीवर साधी- भोळी दिसणारी निया खऱ्या आयुष्यात मात्र बरीच बोल्ड आहे. सोशल मीडियावरील तिचे फोटो आणि व्हिडिओ यातून हे दिसून येते. ‘जमाई राजा 2.0’ मध्ये ती रवी दुबेसोबत पुन्हा दिसणार आहे. वेब सीरिजमधील या दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचीही खूप चर्चा रंगली आहे. अशा परिस्थितीत, नियाने अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

निया शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने नुकताच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ती छतावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. नियाचा हा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड डान्स असल्याचे युजर्स म्हणत आहेत. यात ती बॅकलेस टॉपमध्ये नाचताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत नियाने लिहिले की, “एकतर ब्लॅक किंवा व्हाइट, या दोघांमध्ये काही नाही.”

व्हिडिओ पोस्ट झाल्यापासून युजर्स तिच्या पोस्टवर जबरदस्त प्रतिसाद देत आहेत. काही लोकांना नियाची ही अदा आवडली, तर काहीजण तिला शिष्टाचाराचा धडा शिकवत आहेत. एका युजरने लिहिले, “लाज वाटू दे ताई.” दुसर्‍याने लिहिले की, ‘वेडी दिसत आहेस.” त्याच वेळी, आणखी एका युजरने लिहिले की, “संस्कार नावाची एखादी गोष्ट आहे की नाही.” याव्यतिरिक्त काही लोक असे आहेत, जे नियाची ही अदा पाहून तिच्याकडे आकर्षित होत आहेत. एका युजरने, व्हिडिओ पाहून हॉलिवूडची भावना आली म्हणत तिचे कौतुक केले.

निया शर्मा हॉट लूकने चाहत्यांना वेड लावत असते. अभिनेत्री वारंवार तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करते. तिचे इंस्टाग्राम अकाउंट अक्षरशः बोल्ड फोटोंनी भरलेले आहे.

निया शर्मा तिच्या स्टाईल आणि रंगांबाबत बरेच प्रयोग करताना दिसते. एका मुलाखती दरम्यान ती म्हणाली की, “मला ट्रोलर्सची पर्वा नाही. ट्रोलर्सना माझे काही कपडे आवडत नाहीत, म्हणून मी ते घालायचे बंद करू का?”

निया शर्मा शेवटच्या वेळी, ‘नागिन 4’ मध्ये जास्मीन भसीन, रश्मी देसाई आणि विजेंद्र कुमेरियासोबत दिसली होती. या शोमध्ये नियाने इच्छाधारी नागिनची भूमिका साकारली होती. यासह, नियाने ‘खतरों के खिलाड़ी: मेड इन इंडिया’ची ट्रॉफी आपल्या नावावर केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा